पुणे- सामान्य माणसाबरोबर नोटा बदलण्यासाठी रांगेत उभ्या राहणाऱ्या राहुल गांधी यांची टिंगल करणारे पंतप्रधानाचे वक्तव्य अशोभनीय असल्याची टीका आज येथे पुणे शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे यांनी केली
भारताचे पहिले पंतप्रधान स्व.पं.जवाहरलाल नेहरू यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे स्व.पं.नेहरू यांच्या प्रतिमेस पुणे शहर काँग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सरचिटणीस अभय छाजेड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला .
यावेळी आपल्या प्रास्तविकपर भाषणात शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले,”आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असून देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून पं . नेहरू यांनी भारताच्या विकासाचा पाया रचला. ते आधुनिक भारताचे शिल्पकार होते. ज्या देशामध्ये सुईचे उप्तादन होत नव्हते अशा देशात त्यांनी मोठे मोठे औद्योगीक प्रकल्प चालू केले . शेती विकासाठी भाक्रानांगल असे विविध मोठे मोठे धरण प्रकल्प उभारून अन्न धान्य उप्तादन वाढविण्यासाठी मदत झाली व त्यामुळे देशात कृषी क्रांतीही झाली . गुलाबाचे फुल त्यांना अत्यंत प्रिय होते. लहान मुलांमध्ये ते चाचा नेहरू म्हणून प्रसिद्ध , म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त देशभर आज बालदिन साजरा केला जातो. त्यांनी गोरगरिबांसाठी अनेक योजना सुरु करण्याचे काम केले जेणेकरून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्याचा फायदा पोहोचेल असे महान कार्य त्यांनी केले . पं. जवाहरलाल नेहरू देशाच्या जनतेला आदराने संबोधित करायचे परंतु काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुलजी गांधी यांच्या विरुद्ध जे वक्त्यव केले ते पंतप्रधान पदाला न शोभणारे वक्त्यव आहे. सामान्य जनतेबरोबर रांगेमध्ये उभे राहून राहुलजींनी बँकेतून नोटा बदली करून घेतल्या त्याचा आक्षेप घेऊन पंतप्रधानांनी त्यांची टिंगल टवाळी केली हि बाब अतिशय खेदजनक आहे आणि पंतप्रधान पदाच्या गरीमेला न शोभणारी आहे.”
तसेच आज गुरुनानक जयंतीनिमित्त शीख समाजाला मी शुभेच्छा देतो, त्याच्याबरोबर आद्यक्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांचीही आज जयंती आहे. लहुजी वस्ताद साळवे हे महात्मा ज्योतिबा फुले , वासुदेव बळवंत फडके आणि लोकमान्य टिळक यांचे गुरू होते.त्यांच्या या शिष्यांचा देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सिहांचा वाटा होता.
यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड हे आपल्या भाषणात म्हणाले,” संसद मजबूत झाली तर लोकशाही मजबूत होईल. आपण आपला इतिहास प्रभावीपणे मांडून राजकीय लढा असतो तो विचारांचा लढा असतो. पं . जवाहरलाल नेहरुंनी आधुनिक भारताची पायाभरणी केली आज त्यांच्या औद्योगिक धोरणांमुळे देश सुजलाम सुफलाम आहे.”
यावेळी माजी आमदार दीप्ती चौधरी ,उपाध्यक्ष अजित दरेकर, अंजनीताई निम्हण, हाजीभाई नदाफ, अनिल सोंडकर, बाळासाहेब दाभेकर, राजूशेठ डांगी, नगरसेवक अविनाश बागवे, निलेश बोराटे, सौ.नीता रजपूत, सौ. उषा गलांडे, सुनील शिंदे, विक्रम खन्ना, शंकर राठोड, राजेंद्र पडवळ, जावेद नीलगर, जयकुमार ठोंबरे, अमर परदेशी, कृष्णा सोनकांबळे, शानी नौशाद, शमी मज्जिद, अकबर शेख, राजेंद्र पेशने, विनय ढेरे , सुंदरा ओव्हाळ, अमर गायकवाड, आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपाध्यक्ष .अजित दरेकर यांनी केले तर आभार मुख्तार शेख यांनी मानले.

