पुणे -काँग्रेसच्या राष्ट्रीय नेते राहुल गांधी याच्या गाडीवर गुजरातमध्ये झालेल्या दगड फेकीच्या निषेधार्थ पुणे काँग्रेसतर्फे बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणा देऊन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी हे आज गुजरात दौर्यावर असताना काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगड फेक केली याच्या निषेधार्थ पुणे काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे, महापालिकेतील काँग्रेस गटनेते, अरविंद शिंदे, नगरसेवक अविनाश बागवे, अभय छाजेड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी या कृत्याचा निषेध व्यक्त करत भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली.