पुणे- महापालिकेच्या निवडणुकीत भाजप सरकार निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरून काम करीत आहे. तसेच या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या 8 उमदेवारांचे अर्ज यामुळे बाद झाले आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी भाजप सरकारवर केला.
या विषयी बागवे म्हणाले की, आज अखेर अनेक महापालिकांच्या निवडणुका पहिल्या. मात्र, पुणे महापालिकेच्या निवडणुकीत जाणीवपूर्वक काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडणूक अधिका-याकडून लक्ष केले जात आहे. हे योग्य नसून अधिका-यांनी नियमानुसार काम करणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर हाय कोर्टात देखील दाद मागण्यात येणार आहे, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
पहा आणि ऐका ..नेमके बागवे यांनी काय म्हटले आहे
निवडणूकयंत्रणा पक्षपाती -कॉंग्रेस चा आरोप
Date:

