पुणे -केंद्रातील मोदी सरकारने लादलेल्या ३ शेतकरी विरोधी काळ्या कृषी, कामगार
व महागाईच्या विरोधात शेतकरी संघटनांनी भारत बंद पुकारला. या बंदला
काँग्रेस पक्षाने सक्रीय पाठिंबा दिलाआणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या
वतीने आज काँग्रेस भवनच्या पटांगणात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष
बसवराज पाटील यांच्या उपास्थितीत उपोषण करण्यात आले. या ठिकाणी
बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, ‘‘मोदी सरकारने अनेक निर्णय जनतेच्या
विरोधात घेतले आहे. शेतकरीविरोधी ३ काळे कृषी कायदे संसदेमध्ये बहुमताच्या
जोरावर पारित करून घेतले. देशातील कष्टकरी, कामगारांच्या विरोधात कायदे
आणून भांडवलदारांचे फायदे करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. आज पेट्रोल,
डिझेल, गॅसचे आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले असून सामान्य
नागरिकाला जगणे कठिण झाले आहे. खोटे आश्वासन देऊन, जनतेची दिशाभुल
करून भाजप सरकार सत्तेवर आले. मोदी सरकारचे अपयश अनेक क्षेत्रात दिसून येत
आहे. काँग्रेस एक विरोधी पक्ष म्हणून सरकारच्या अनेक वादग्रस्त धोरणांच्या
विरोधात संसदेत आणि संसदेच्या बाहेर विरोध करीत आहे. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य
मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. आज मोदी सरकारच्या चूकीच्या धोरणाला काँग्रेस
पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे नेते
आंदोलन आणि उपोषण करून सरकारचे लक्ष वेधत आहे. पाऊस, थंडी आणि
कडाक्याचे ऊन असताना सुध्दा आज दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आपल्या
हक्कासाठी गेले चार महिने आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांना भेटून त्यांचे प्रश्न
समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यात मोदी सरकारला रस नाही. सत्तेसाठी विविध
राज्यात जावून प्रचार करायला मात्र वेळ आहे. कृषी कायदा व संघराज्यीय प्रणालीवर
सरळसरळ हल्ला आहे. शेती, बाजारव्यवस्था हे विषय राज्य सरकारच्या
अखत्यारित असल्याचे संविधानाच्या सातव्या अनुसूचित आहे.आत्तापर्यंत असलेल्या बाजार व्यवस्थेमुळे राज्य सरकारला कर रूपाने
मिळणार महसूलही केंद्र सरकारने एकतर्फी निर्णय घेऊन संपुष्टात आणाला आहे जो
संविधानाच्या विरोधात आहे. शेतकरी कामगार व जनतेचे हित लक्षात घेऊन मोदी
सरकारने सर्व चूकीचे कायदे रद्द करावे.’’
यावेळी पुणे महापालिकेतील गटनेते आबा बागुल, नगरसेवक अरविंद शिंदे, अविनाश बागवे, अजित दरेकर, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. संजय जगताप, पिंपरी -चिंचवड काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे, प्रदेश प्रवक्ते रत्नाकर महाजन,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे,दिप्ती चवधरी, संजय बालगुडे, विजय अंबुरे,, गोपाळ तिवारी, मनीष आनंद, चाँदबी नदाफ, वैशाली मराठे, रमेश अय्यर, शेखर कपोते, राजेंद्र शिरसाट, संगीता तिवारी, सोनाली मारणे, विशाल मलके, भुषण रानभरे, मनोहर गाडेकर, प्रकाश पवार, हाजी नदाफ, साहिल केदारी, यासीन शेख, शिलार रतनगिरी, कैलास गायकवाड, बाळासाहेब
अमराळे, ब्लॉक अध्यक्ष राजेंद्र भुतडा, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, विजय
खळदकर, सुनिल घाडगे, रमेश सकट अजित जाधव, शाबीर खान, सुरेखा खंडागळे,
मीरा शिंदे, हनुमंत पवार, अशोक जैन, विठ्ठल थोरात, भारत सुराणा, राजू शेख,
सुनिल पंडित, अनिस खान, ज्योती परदेशी, राधिका मखामले, कल्पना उनवणे व
इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उभे होते.यानंतर काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांना भेटून निवेदन सादर केले.
‘‘मोदी सरकारच्या चूकीच्या धोरणाविरूध्द काँग्रेस संघर्ष करणार.’’-बसवराज पाटील,
Date:

