Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुण्यात काँग्रेस मोबाईल क्लिनिकद्वारे १७ हजार जणांवर मोफत उपचार

Date:

पुणे – कोरोना संसर्गजन्य आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी काँग्रेसचे मोबाईल क्लिनिक सक्रीय झाले आहे. त्याद्वारे पुण्यातील १७ हजारजणांची आरोग्य तपासणी करुन त्या सर्वांना मोफत औषधोपचारही देण्यात आले आहेत अशी माहिती काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात विविध क्षेत्रात काँग्रेस पक्ष काम करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून १७ एप्रिलपासून पक्षाच्या वतीने मोबाईल क्लिनिक उपलब्ध करुन देण्यात आले. १७ एप्रिल रोजी मंगळवार पेठेतील कडबाकुट्टी येथे मोबाईल क्लिनिकचे उदघाटन करण्यात आले. तेव्हापासून आजतागायत ही सेवा अखंडपणे सक्रीय आहे.

लॉकडाऊनच्या काळात शहराच्या अनेक भागात, झोपडपट्ट्यांमध्ये डॉक्टरांकडे जाऊन तपासणी आणि उपचार करुन घेणे अतिशय मुश्कील झाले. डॉक्टरांची कमतरता जाणवत होती. औषधे मिळत नव्हती, परवडतही नव्हती त्यामुळे कोरोना तसेच त्याव्यतिरिक्त अन्य आजारांवरही उपचार आणि औषधे मिळणे अनेकांना अवघड झाले होते. समाजाची गरज लक्षात घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशन ची पुणे शाखा, भारतीय जैन संघटना, फोर्ब्स मोटर्स यांच्या सहकार्याने काँग्रेस पक्षाने मोबाईल क्लिनिक ही मोहीम हाती घेतली. शहरातील वाड्या-वस्त्या, झोपडपट्ट्या, कन्टेंन्मेंट क्षेत्र अशा ठिकाणी जाऊन लोकांची तपासणी केली. हे काम अतिशय जोखमीचे होते. परंतु साऱ्या टीमने अतिशय धैर्याने हे काम केले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सर्व लोकांमध्ये जावून याउपक्रमाची, आरोग्य विषयाबाबत जनजागृती केली. त्यामुळे उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. मोबाईल क्लिनिकमधील अत्याधुनिक आरोग्य यंत्रणा आणि एमबीबीएस, एमडी असलेले तज्ज्ञ डॉक्टर्स यांच्यामुळे या सेवेचा दर्जा उच्च राहिला. प्रशासनालाही मोबाईल क्लिनिक सेवेद्वारे चांगले सहकार्य मिळाले असे जोशी यांनी सांगितले.

या मोहीमेमध्ये ४१ रुग्ण असे आढळले की ते कोरोना संसर्गाच्या प्राथमिक अवस्थेत होते. हे निदान वेळीच झाले. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. कोरोनाबाधित रुग्णांच्या निदानाची माहिती प्रशासनालाही उपयुक्त ठरली. ते रुग्ण ज्या परिसरातील होते तिथे तातडीने साथ नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना करता आल्या. मोबाईल क्लिनिकचा असाही चांगला उपयोग झाला. सर्दी, खोकला, ताप, पोट बिघडणे, बीपी आदी आजारांवरही मोबाईल क्लिनिकमध्ये तपासण्या होऊन उपचार करण्यात आले. आबालवृद्धांना या सुविधेचा फायदा झाला असेही मोहन जोशी यांनी सांगितले.

शहरातील पीएमपीच्या डेपोंमध्ये कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. औषधोपचारही देण्यात आले. कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देवदासींचीही आरोग्य तपासणी करुन त्यांना योग्य ती औषधे देण्यात आली.

मोबाईल क्लिनिकमधील डॉक्टर्स आणि सहकाऱ्यांना पीपीई कीट, मास्क्स, सॅनिटायजर आदी सुविधा पुरविण्यात आल्या, उपचारांच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले. आरोग्य सेवा सहजपणे उपलब्ध करून देता आली यांचे आम्हाला समाधान आहे. ही आरोग्य सेवा यापुढेही चालूच राहाणारे आहे.

या मोहीमेत इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे चे पदाधिकारी डॉ.राजन संचेती, डॉ.आरती निमकर, डॉ.संजय पाटील, डॉ.सुनील इंगळे, डॉ.आशुतोष जपे, डॉ.हिलरी रॉड्रीक्स आणि असंख्य डॉक्टरांचे सहकार्य लाभले.

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही सज्ज आहोतच. पुणेकरांनीही काळजी घ्यावी, गर्दी टाळावी, आरोग्य राखावे, आपल्याला या साथीवर लवकरात लवकर मात करायची आहे असे आवाहन मोहन जोशी यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कात्रज घाटात तरुणीने तरुणाला लुटले

पुणे- इंस्टाग्रामवरील ओळखीमुळे एका 28 वर्षीय तरुणाला लुटल्याची धक्कादायक...

आता विमान उड्डाणासाठी 15 मिनिटांच्या विलंबाचीही चौकशी होईल:कंपनीला कारण सांगावे लागेल; नियम तत्काळ बदलले

देशातील विमान वाहतूक क्षेत्रात प्रथमच तांत्रिक त्रुटींच्या देखरेखीची संपूर्ण...

वनराजची पत्नी सोनाली सह बंडू आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर निवडणूक रणांगणात… पोलीस बंदोबस्तात ..

पुणे-स्वतःचा नातू आयुष कोमकर खूनप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला...