केंद्र सरकारच्या चूकीच्या आर्थिक धोरणामुळे देशात मंदीचे सावट – रमेश बागवे

Date:

पुणे-केंद्र सरकारच्या चूकीच्या धोरणामुळे देशभर आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आर्थिक मंदीमुळे अनेक उद्योगधंदे आणि सेवा ठप्प झाल्या आहेत. त्याचा विपरीत परिणाम
महाराष्ट्रातील युवक, शेतकरी, शेतमजुर तसेच समाजातील गरीब, मागास, अल्पसंख्यांक आणि
दारिद्रय रेषेखालील लोकांना सहन करावा लागत आहे. या आर्थिक मंदी, बेरोजगारी, महागाई,
शेतकरी आत्महत्या, वाढती गुन्हेगारी, ठप्प झालेले उद्योगधंदे याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा
काँग्रेस कमिटीच्या वतीने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन
करण्यात आले. यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, केंद्र सरकारच्या चूकीच्या
आर्थिक धोरणामुळे देशात मंदीची परिस्थती निर्माण झाली आहे. युपीए सरकारच्या कार्यकाळात
सन २०१० ते २०११ मध्ये १०.८% असलेला जीडीपी २०१९ मध्ये विद्यमान सरकारच्या
काळात ५% पर्यंत घसरला आहे. देशातील सुमारे १९ लाख कंपन्यांना वर्षभरामध्ये टाळे लागले
असून त्यापैकी सर्वाधिक १.९२ लाख कंपन्या महाराष्ट्रातील आहेत. जागतिक बँकेच्या
अहवालानुसार भारतीय अर्थव्‍यवस्थेची ५ व्‍या स्थानावरून ७ व्‍या स्थानावर घसरण झाली
आहे. वाहन क्षेत्रात २ लाख नोकऱ्यांवर गदा आली आहे व १० लाख रोजगारावर कुऱ्हाड कोसळली
आहे. महाराष्ट्रावर सुमारे ५ लाख कोटीचे कर्ज आहे. भारताच्या बेरोजगारीने ४५ वर्षांचा उच्चांक
मोडला आहे. मंदीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या
आहेत. उद्योगक्षेत्राप्रमाणेच शेती क्षेत्रावर देखील मंदीचा परिणाम झाला आहे. मराठवाड्यामध्ये
अपुरा पाऊस झाला आहे व या भागातील पिके पावसा अभावी करपून गेली आहेत. स्वामीनाथन
आयोगाची अमंलबजावणी, शेती मालाला दिड पट हमी भाव, संपूर्ण कर्जमाफी आणि शेतकऱ्यांसाठी
पेन्शन आदी कारणांसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी जूनमध्ये संप केला होता. मात्र सरकारने
शेतकऱ्यांच्या मागण्यांना जाणीवपूर्वक बगल दिली आहे. राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत
आहे. गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे असताना सुध्दा गुन्हे रोखण्यात ते अपयशी ठरले. सरकारने
अर्थव्‍यवस्थेला लागलेली उतरती कळा थांबविण्यासाठीतातडीने पाऊल उचलावे अन्यथा जनतेच्या

हिताकरीता तीव्र आंदोलन काँग्रेस पक्षातर्फे करण्यातयेईल.’’
आमदार अनंतराव गाडगीळ, मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड यांचीही भाषणे झाली.
त्यानंतर काँग्रेस पक्षाचे शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी मा. नवल किशोर राम यांना भेटून निवेदन
सादर केले.
यावेळी नगरसेवक मनीष आनंद, अविनाश बागवे, रफिक शेख, रमेश अय्यर, महिला
अध्यक्षा सोनाली मारणे, रजनी त्रिभुवन, साहिल केदारी, सुजित यादव, राजेंद्र शिरसाट, यासीन
शेख, प्रशांत सुरसे, गोपाळ पायगुडे, संजय कवडे, चेतन आगरवाल, सचिन आडेकर, सुनिल घाडगे,
प्रदिप परदेशी, रमेश सोनकांबळे, रमेश सकट, अशोक लांडगे, बाबा नायडू, शिलार रतनगिरी,
नारायण पाटोळे, लुकस नायडू, लतेंद्र भिंगारे, राजू गायकवाड, विनय ढेरे, संतोष डोके, रणजित
गायकवाड, कल्पना भोसले, मंदा जाधाव, वैशाली पारखी, शितल जाधत, अलका मोरे, सुरेखा
जाधव, शर्वरी गोतारणे, रजिया बल्लारी, ज्योती अरवेन, छाया जाधव, नंदा ढावरे, मीरा शिंदे, दुर्गा
देशमुख, ललिता जगताप, रूपाली गायकवाड, संगीता क्षिरसागर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते
मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यस्तरीय ७ वा जाधवर विज्ञान महोत्सव शनिवारी 

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय...

निवडणुकीत पैशांच्या गैरवापरावर प्राप्तिकर विभागाची करडी नजर; २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात होणाऱ्या...

ग्रंथ दालनातूनच साहित्य संमेलनस्थळी प्रवेश

पुणे : साहित्यिक, सांस्कृतिक विकासासाठी लेखक, प्रकाशक, विक्रेता आणि...

महाराष्ट्रात 600 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पांसाठी विक्रन इंजिनीअरिंगचा ₹2,035 कोटींचा ईपीसी करार

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारण्यात येणारी 600 मेगावॅट एसी सौरऊर्जा...