केंद्रातील सरकार बदलल्याशिवाय गत्यंतर नाही- शरद पवार

Date:

पुणे(प्रतिंनिधी)— पुण्यामध्ये ज्या ज्या वेळी समोरच्या उमेदवाराची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी केली
जाते ता-त्या वेळी आपला उमेदवार हमखास निवडून येतो हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे पुणे
लोकसभा मतदार संघाबरोबरच जिल्ह्यातील चारही जागांवार कोंग्रेस-राष्ट्रवादी कोंग्रेस आघाडीचे
उमेदवार विजयी होतील असा विश्वास राष्ट्रवादी कोंग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केला. ज्यांना
संवेदना नाहीत असे सरकार केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आहे. त्यांना बदलल्याशिवाय गत्यंतर नाही
असेही ते म्हणाले.

पुणे शहर लोकसभा मतदार संघासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी
संघटना,रिपब्लिकन पीपल्स आघाडी व मित्र पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा निसर्ग
मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी पुणे लोकसभा
मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार मोहन जोशी, राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, महाराष्ट्राच्या
सहप्रभारी सोनल पटेल, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जेष्ठ नेते उल्हास पवार, माजी मंत्री
हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री नितिन रावूत, बाळासाहेब शिवरकर, शेकापचे नेते प्रविण गायकवाड,
काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे, कमलताई
ढोले पाटील, दीप्ती चवधरी, पी.ए. इनामदार, अरविंद शिंदे, अंकुश काकडे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ज्यावेळी समोरच्या उमेदवारां विषयी जास्त प्रसिद्धी केली जाते तेव्हा त्या विरोधातला
उमेदवार हमखास विजयी होतो, तशी परिस्थिती सध्या पुण्यात आहे.विरोधकाकडे काही सांगण्यासाठी
काही नाही फक्त पैसे आहेत. त्यामुळे ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे.
पुणे जिल्ह्यातील चारही जागा जिंकण्याची खात्री मला आहे. विरोधकाकडे पैसे आहेत लक्ष ठेवा आणि
भाजपा- शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना खाजगीत सांगा की भले करून घ्या पुन्हा संधी मिळणार नाही.
भाजपवर टीका करताना मोदी म्हणाले, भाजपच्या राजवटीत हल्ले वाढले आणि माणस आपापसात
भिडले गेल्या तीन चार वर्षांत विविध घटकात हल्ले होत आहेत.गेल्या तीन चार वर्षांत आत्महत्या
करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या वाढली आहे. शेतकऱ्याला इतकी टोकाची भूमिका घ्यायला भाग पाडले
याचे कारण त्याला दिलेलं आश्वासन पाळलं गेलं नाही.ही सर्व जबाबदारी नरेंद्र मोदी यांची आहे.
इतकी गंभीर परिस्थिती असताना सत्ताधारी पक्षाचे नेते बेताल वक्तव्य करत फिरत आहेत. एकदा
त्यांचे प्रदेशध्यक्ष अध्यक्ष दानवे शेतकर्‍यांना साले म्हणाले, तर काही दिवसांपूर्वी एक नेत्याने
आत्महत्या करणार्‍या शेतकऱ्यांची पोर म्हणजे लावारीस असे वक्तव्य केले. याचा अर्थ स्पष्ट की
सामान्य नागरिकांची यांना काही देणेघेणे नाही.
मोदी मला जाहीर सभेत प्रश्न विचारतात की शेतकरी आत्महत्या करताना तुम्ही कृषीमत्री होते तर
तुम्ही काय केले? मी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना घेवून आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या घरी

पंतप्रधानांना घेऊन यवतमाळला गेलो आणि दुसऱ्या दिवशी ७० हजार कोटीच कर्ज माफ केलं,तुम्ही
काय केलं सांगा ते सांगा असा सवाल त्यांनी केला? .
मोदीच्या राजवटीत शेतकरी उध्वस्त झाला. प्रत्येक भाषणांत मोदी काय केलं हे न सांगता काँग्रेस
आणि गांधी घराण्याला शिव्या घालत बसतात. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी काय केलं म्हणून हे
विचारतात यांना काय माहिती नाही का ? आज शेतात काम करणारी बाई देखील फोनवर बोलते. हे
तंत्र्द्यान कोणी आणले? राजीव गांधी म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वाने आणले. यांना माहीत नाही का
लष्करातील जवान शहीद झाले त्यानंतर बैठक बोलावली त्यात आम्ही सर्व नेते सहभागी होतो. जी
मदत करायची असेल ती लष्कराला करा अस आम्ही संगितले होते. त्यानंतर आपण प्रत्त्युत्तर दिल…
दुर्दैवाने यात आपलं एक विमान पडलं आणि आपला अभिनंदन हा जवान त्यांच्या हद्दीत गेला. एक
आंतरराष्ट्रीय करार होता…सर्व देशांनी ठराव केल्यानंतर त्या मार्गातून आपला अभिनंदन परत आला
आहे. मोदी म्हणतात ५६ इंचाची छाती मग कुलभूषण जाधव यांची सुटका का करून आणत नाहीत
असा सवाल त्यांनी केला. आमच्या जवानांनी शौर्य दाखवलं त्याचा राजकीय फायदा कुणी घेऊ नका
अशी विनंती अभिनंदनच्या कुटूंबानी आणि मित्रांनी केली होती. मात्र भाजपा त्याचा राजकारणासाठी
उपयोग करत आहे.
मोदी आणि फडणवीस यांच्या काळात पुण्यात कुठला नवीन कारखाना आला हे त्यांनी
दाखवावं.लोकांच्या समोर मोठं मोठं बोलायच आणि सगळं मीच केलं अस लोकांना सांगयाच.राजीव
गांधी यांनी बोफोर्सच्या चौकशीची करण्याची तयारी दर्शवली होती. हे ना खाऊंगा ना खाणे दुगां
म्हणायचे मग राफेल प्रकरण काय आहे.? ज्या अनिल अंबानी यांनी कागदाच विमान उडवल नाही
त्यांना संरक्षण खात्यातल विमान बनविण्याच काम दिले अशी टीका पवार यांनी केली.
मोदी प्रत्येक सभेत काँग्रेस वर टीका करतायत, गेल्या आठवड्यापासून माझं ही नाव घ्यायला लागलाय
बाबा, मला पण बर वाटल की मी पण मोठा झालोय काँग्रेसच्या लाईनित आलो.सभेत वर्ध्याला हे
माझ्यावर बोलले काय बोलले अजित पवार यांनी कुटूंबाचा ताबा घेतला, घरात आलबेल नाही, त्यांना
सांगतो मोदी साहेब आमच्यावर आमच्या आईचे काही संस्कार होते आमच्या घरात तीन पदंश्री आणि
पद्म विभूषण आहे विचार करा जिने हे घडवलं ती कशी असेल.यांना घरदार नाही, आणि दुसऱ्याच्या
घरात डोकावतायत असा टोला त्यांनी मोदी यांना लगावला. स्वतः च अपयश झाकण्यासाठी काँग्रेस
आणि गांधी घराण्यावर टीका करतायत आणि आता माझ्यावर पण आलेत. परंतु कितीही काही बोला
माझ्या अंगाला भोकं नाही पडत असे पवार म्हणाले.
नितीन राऊत म्हणाले, २०१९ची ही निवडणूक अत्यंत अटीतटीच्या प्रसंगावर येऊन ठेपली आहे. या
देशाला स्वातंत्र्यलढाई प्रमाणे परिस्थिति निर्माण झाली आहे. सामाजिक वातावरण बिघडवले जात
आहे. मोदींनी देशाचे संपूर्ण सामाजिक वातावरण कलुषित केले आहे. देशाला महासत्ता बनविण्यासाठी
एकही काम मोदी सारकारने केले नाही. एकही आश्वासन पूर्ण केले नाही. सरकार सत्तेवर आल्यानंतर
दलितांवरील अत्याचार्यांमध्ये वाढ झाली आहे. रोहीत वेमुलाला आत्महत्या का करावी? मुस्लिमांना
मांस खाल्ले म्हणून मारहाण केली जाते तेव्हा चौकीदार कुठे होते? असा सवाल त्यांनी केला.

पुलवामा हल्ला करण्यासाठी गाडी आरडीएक्स घेऊन गेली. तेव्हा यांचा इंटेलिजन्स कुठे होता. सर्व
यांच्या संगनमताने हे झाले आहे, असा आरोप त्यांनी केला. न्यायाधीशांना धमकवण्याचे काम सुरू
आहे. संविधानाचे बारा वाजवले आहे. डॉ. बाबासाहेबांनी संविधान लिहिले. त्यातील कलमे बदलण्याचा
प्रयत्न झाला. संविधान बदलण्याची तर २०१९ ची ही शेवटची निवडणूक असल्याचे वक्तव्य भाजपचे
नेते करत आहेत. ज्यांनी संविधान जाळले त्यावेळी हे चौकीदार काय करत होते? आम्हाला
कोणत्याही परिस्थितीत भाजप पुणे शहरातून घालवावे लागेल.
सोनल पटेल म्हणाल्या, गुजरातचे विकासाच्या मॉडेलचा प्रचार करून मोदींनी सर्वाना फसविले.
गुजरातच्या विधानसभेच्या वेळी जनतेच्या लक्षात आले. काँग्रेसला सत्तेसाठी फार थोड्या कमी जागा
कमी पडल्या. लोक या सरकारला वैतागले आहेत. लोकांना मोदी सरकारला घालवण्याची ईच्छा आहे.
लोकांकडे जाऊन त्यांना विश्वास द्यावा लागेल.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, पुणे जिल्ह्यातील चारही जागा चांगल्या मताधिक्याने निवडून आणायच्या
आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून अन्याय झाला आहे. तशा प्रकारची वागणूक यापुर्वी कोणत्याही
सरकारच्या काळात दिली गेली नाही. सर्वांची जबाबदारी मोहन जोशी शहरी भागात तळागाळातील
कार्यकर्ता आहे. अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. जातीयवादी सरकार उलथवून लावण्यासाठी
सर्वांनी एकत्रितपणे काम करावे लागेल. व मोहन जोशींना चांगल्या मताधिक्याने निवडून आणावे असे
आवाहन त्यांनी केले.

प्रवीण गायकवाड म्हणाले, लोकशाही धोक्यात आली आहे. पुरोगामी विचारांच्या ६३ जणांना पोलीस
संरक्षण देण्यात आले आहे. बोलण्याचा आणि लिहिण्याचा अधिकार आम्हाला संविधानाने दिला
असताना आमची गळचेपी केली जात आहे. त्यामुळे केंद्रातील भाजपचे सरकार उलथवून टाकण्याची
आवश्यकता आहे.
रमेश बागवे म्हणाले, ही निवडणूक केवळ लोकसभेची नाही तर मूल्य टिकवण्याची आहे. लोकशाही
पाहिजे की हुकूमशाही पाहिजे हे ठरविण्याची ही निवडणूक आहे. संविधान धोक्यात आहे. त्यामुळे
सर्वांनी लोकशाहीला धोका ओळखून केंद्रातील भाजप सरकार घालविले पाहिजे.
मोहन जोशी म्हणाले, या निवडणुकीला सामोरे जाताना १९९८ सालची लोकसभेची निवडणूक आठवते.
त्यावेळी विठ्ठल तुपे होते. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेऊन विठ्ठल तुपेंना विजयी
केले होते. आजची निवडनुक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर
आणि आघाडीच्या सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या जोरावर या निवडणूकीमध्ये विजयी होईल असा
विश्वास त्यांनी व्यक्त केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...