सोनिया गांधींच्या वाढदिवसा निमित्त कॉंग्रेसचा सेवा ,कर्तव्य, त्याग सप्ताह- विविध उपक्रम(व्हिडीओ)

Date:

पुणे :  कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या  सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक ऐक्य परिषदेने अखिल भारतीय कॉंग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते रविवार, दिनांक २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे सप्ताहाचे उद््घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात असणार आहेत. यावेळी माजी खासदार रजनी पाटील, सोनलबेन पटेल, खासदार कुमार केतकर, आमदार भाई जगताप, पी.ए.इनामदार आदी उपस्थित राहणार आहेत.
यंदा सप्ताहाचे चौदावे वर्ष असून दिनांक २ ते ९ डिसेंबर २०१८ दरम्यान महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शन, देशात आणि पुण्यातील कॉंग्रेसचे योगदान सांगणारे प्रदर्शन, भारतीय नौदलाला रंगावलीतून सलाम, सोनिया गांधी हेल्थ कार्ड प्रदान सोहळा, भारतीय संविधानाला सुरुंग- परिसंवाद, राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा, जागतिक अपंग दिनानिमित्त राष्ट्रपती पुरस्कार विजेते दिव्यांग युवकांचा सन्मान, पर्यावरणपूरक मूर्तीकला कार्यशाळा, पोलीस बांधवांसोबत कृतज्ञता सोहळा यांसह विविध कार्यक्रम होणार आहेत.
 सप्ताहातील विविध कार्यक्रमांमध्ये खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी, अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष माजी मंत्री डॉ.नितीन राऊत, माजी आमदार उल्हास पवार, शरद रणपिसे, आमदार डॉ.विश्वजीत कदम, अनंत गाडगीळ, अ‍ॅड.जयदेव गायकवाड, बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी यांसह शहरातील सर्व नेते मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर, जागतिक अपंग दिनानिमित्त बिबवेवाडी येथील आधार मूकबधिर केंद्रामध्ये दिव्यांग राष्ट्रपती पदक प्राप्त युवकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन सोमवार, दिनांक ३ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी व कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिली.
* लई झाली मन की बात, येऊन पहा काम की बात – पोस्टर प्रदर्शन :-
कॉंग्रेस पक्षाने गेल्या ६० वर्षांच्या काळात व्यापक प्रमाणात देशउभारणी केली. स्व.राजीव गांधी यांच्या काळात डिजिटलायझेशन आणि संगणकीय युगाची पायाभरणी झाली. परंतु सध्या, कॉंग्रेसने गेल्या ६० वर्षांत काहीही केले नाही, असा अपप्रचार केला जात आहे. त्यामुळे या कॉंग्रेसी योजनांचा लाभ घेऊन पुढे आलेली युवा पिढी आणि दूर गेलेला सुशिक्षीत वर्ग या अपप्रचाराला बळी पडला. त्यांना कॉंग्रेस पक्षाच्या देश, राज्य व पुण्यााच्या विकासात कॉंग्रेसने केलेल्या भरीव योगदानाविषयी व गेल्या साडे चार वर्षात नरेंद्र मोदी यांनी देशातील स्वायत्त संस्था संपुष्टात आणल्याचे चित्र लई झाली मन की बात, येऊन पहा काम की बात या पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद््घाटन मंगळवार, दिनांक ४ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या  प्रियंका चतुर्वेदी यांच्या हस्ते होणार आहे. हे प्रदर्शन गुरुवार, दिनांक ६ डिसेंबर पर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.
* विद्यार्थ्यांकरीता राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा :-
इयत्ता १ ली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांकरीता भव्य राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सारसबागेत ही स्पर्धा रविवार, दि. २ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता होणार आहे. खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण, माजी आमदार उल्हास पवार हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे आयोजित स्पर्धेत आत्तापर्यंत १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सहकारनगर येथील पंडित भीमसेन जोशी कलादालन येथे होणार आहे. यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी उपमहापौर आबा बागुल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वोत्तम चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येईल.
* सोनिया गांधी हेल्थ कार्ड प्रदान सोहळा :-
समाजामध्ये प्रत्येक कुटुंबात महिला या संपूर्ण घराला आकार देतात. त्यामुळे महिलांचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. महिलांचा विकास झाला, तरच कुटुंबाचा, पर्यायाने समाजाचा आणि देशाचा विकास होणार आहे. त्यामुळे महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरीता गरजू आणि कष्टकरी महिलांना सोनिया गांधी हेल्थ कार्ड प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता कोथरुड हॅपी कॉलनीतील बिंदु माधव ठाकरे हॉस्पिटल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आमदार डॉ.विश्वजीत कदम, पुणे शहर कॉंग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष रमेश बागवे उपस्थित राहणार आहेत. रुबी हॉल क्लिनीकतर्फे महिलांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
* भारतीय संविधानाला सुरुंग – परिसंवाद :-
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला धक्का लावण्याचा प्रयत्न करीत समाजविरोधी निर्णय घेणा-या सध्याच्या सरकारची स्थिती पुणेकरांसमोर परिसंवादातून उलगडणार आहे. गुरुवार, दिनांक ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे परिसंवादाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी अनुसुचित जाती सेलचे अध्यक्ष डॉ.नितीन राऊत, माजी आमदार अ‍ॅड. जयदेव गायकवाड हे उपस्थित राहणार आहे.
* जागतिक अपंग दिनानिमित्त राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या दिव्यांग युवकांचा सन्मान सोहळा:-
समाजात विविध घटकांमध्ये सेवाभावी वृत्तीने काम करणारे असंख्य कार्यकर्ते असतात. निस्वार्थीपणे सेवा बजावणा-या लोकांना पोहचून गौरव करण्याचा उपक्रम सातत्याने राबविला जातो. कला, क्रीडा, संगीत क्षेत्रात देशाचे नाव उंचावणा-या दिव्यांग राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. देशाप्रती असलेले आपले कर्तव्य पार पाडत सेवा देणा-या जलतरणपटू धनंजय भोळे, भरतनाटयम् नृत्यांगना प्रेरणा सहाणे, सायली आगवणे, जलतरणपटू सुयश जाधव, प्रणव दिवेकर, अभिनेत्री गौरी गाडगीळ या दिव्यांग युवा खेळाडूंना सन्मानित करण्यात येणार आहे. सोमवार, दिनांक ३ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता बिबवेवाडीतील आधार मूकबधिर केंद्र येथे आमदार शरद रणपिसे, बालकल्याण विभागप्रमुख मिनीता पाटील, सामाजिक कार्यकर्ते राहुल देशमुख उपस्थित राहणार आहेत.
* भव्य रंगावलीतून भारतीय नौदलाला मानवंदना :-
———————————-
भारतीय नौदल दिन कार्यक्रम मंगळवार, दिनांक ४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता अप्पा बळवंत चौकातील प्रभात थिएटरसमोर असलेल्या नूतन मराठी शाळेमध्ये होणार आहे. यावेळी २० बाय ३० आकारातील भव्य रंगावली काढण्यात येणार असून शाळेतील ८०० हून अधिक विद्यार्थी सैन्यदल व सेनाधिका-यांना मानवंदना देणार आहेत. कार्यक्रमाला आमदार अनंत गाडगीळ, कॅप्टन अरुण मनगुटकर यांसह लष्करातील सेनाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय कला अकादमी आणि अमर लांडे हे रंगावली साकारणार आहेत.
* ईको फ्रेंडली मूर्तीकला कार्यशाळा :-
————————-
पर्यावरणाचा होणारा -हास कमी करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती करण्याकरीता ईको फ्रेंडली मूर्तीकला कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये पुणे शहरातील विविध शाळांमधील १०० हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. घोले रस्त्यावरील राजा रवि वर्मा आर्ट गॅलरीमध्ये शुक्रवार, दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. यावेळी ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी, माजी आमदार दिप्ती चवधरी यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
समाजाचे संरक्षण करणा-या पोलिसांसोबत कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन बुधवार, दिनांक ५ डिसेंबर रोजी खडक पोलीस स्टेशन येथे करण्यात आले आहे. याशिवाय अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सप्ताहामध्ये करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रमांना मोफत प्रवेश असून नागरिकांनी यामध्ये मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...