पुणे (प्रतिनिधी)- महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्यावतीने सोशल
मिडिया आणि राजकीय संवाद या विषयावर माजी केंद्रिय मंत्री आणि कॉंग्रेसचे
ज्येष्ठ नेते शशी थरुर यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात
आला आहे. हा कार्यक्रम येत्या 17 मे रोजी कॉंग्रेस भवन येथे होणार
आहे.अशी माहिती प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे चिटणीस शेहनाज पुनावाला यांनी
दिली
थरुर यांच्या कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित
करण्यात आली होती. आज सोशल मिडिया हा फार संतर्क झाला आहे.राजकीय
पक्षांनी सुध्दा त्यासाठी आपले स्वतंत्र सेल उभे केले आहेत.अनेक पक्ष
आपला मुद्दा सर्व प्रथम सोशल मिडिया मांडतात त्यातून येणाऱ्या
प्रतिक्रिया जाणून घेऊन मग त्याबाबत मते ठरविली जातात. त्यामुळे आता
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सुध्दा याबाबत विचार करत असून एक स्वतंत्र
सोशल मिडिया सेल सुरु करण्याचा विचार सुध्दा पक्षाचा आहे. कॉंग्रेसचे
नेते शशी थरुर हे नेहमी सोशल मिडिया वर सक्रिय असतात. भाजपाच्या प्रत्येक
सोशल मिडियावरील कॉमेंन्टला ते विरोध करत असतात त्यामुळेच आम्ही पुण्यात
त्यांचे व्याख्यान ठेवले आहे. या कार्यक्रमाला कॉंग्रेस शहराध्यक्ष रमेश
बागवे उपस्थित राहणार आहेत
कॉंग्रेस चे नेते शशी थरूर यांचे १७ मे ला व्याख्यान …
Date:


