पुणे-आम्ही सर्वधर्मियांना मानणाऱ्या, धार्मिक सलोखा राखणाऱ्या देशाचे नागरिक आहोत ,कोणत्याही धर्मा धर्मात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करू नये ,भारतातील मुस्लिमांनी तर अशा पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे , मुस्लीम समजाच्या पाठीशी कॉंग्रेस पक्ष खंबीरपणे उभा होता, आहे आणि राहीन असे येथे पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी स्पष्ट म्हटले आहे.
ते म्हणाले,’ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्याच्या मेळाव्यात बोलताना म्हणाले की, ‘‘राज्यात मशिदीच्या बाहेर असलेले भोंगे काढले पाहिजे तसे जर काढले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मशिदीसमोर भोंगे उभे करून हनुमान चालिसा लावतील. मुंबई आणि नाशिक शहरात मनसे कार्यकर्त्यांनी भोंगे उभे करून हनुमान चालिसा लावली त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. रमजानच्या पवित्र महिन्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे असे वादग्रस्त विधान करून समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत. काँगेसने नेहमी धार्मिक सलोखा राखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र हे पुरागामी विचारांचे राज्य आहे आणि त्याला काँग्रेस ठेच पोहचू देणार नाही. मुस्लिम समाजाच्या मागे काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा राहील’’ असे वक्तव्य शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.

