अजितदादांच्या पुण्यातील निओ मेट्रो च्या योजनेला कॉंग्रेसचा विरोध

Date:

पुणे- पुण्यातील एचसीएमटीआर रस्त्याऐवजी तिथे निओ मेट्रो करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या योजनेला पुण्यातील कॉंग्रेसच्या नेत्यांनी विरोध करण्याचा निर्धार केला असून याची पहिली ठिणगी पडली आहे. शहर कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि प्रदेश कॉंग्रेसचे विद्यमान सरचिटणीस अभय छाजेड यांनी अजितदादांना ,निओ मेट्रो ला विरोध असल्याचे थेट पत्र लिहून कळविले आहे. या पत्राची प्रत महापालिका आयुक्तांना दिली आहे.

बीआरटी ला विरोध करीत अजितदादांनी कलमाडींचे महापालिकेतील राज्य उलथवून टाकले होते ,मात्र त्यानंतर महापालिकेत स्वतः ची सत्ता प्रस्थापित झाल्यावर मात्र त्यांनी बीआरटी सुरूच ठेवली नवनवे प्रकल्प बीआरटी चे राबविले . सध्या बीआरटी ची अवस्था असून नसल्यासारखी आहे. बीआरटी चे करोडो अब्जो रुपये कुठे हवेत गायब झाले असे वाटावे अशी स्थिती आहे . शहरात खाजगी वाहनांची संख्या वेगाने वाढत असताना त्यांची गळचेपी बीआरटी द्वारे करीत खाजगी वाहने वापरणाऱ्या नागरिकाना त्रास देण्यात आला अशी भावना वाढीस लागली आहे .

अशी परिस्थिती असताना अजितदादांनी निओ मेट्रो चा प्रस्ताव आता आणला आहे. एचसीएमटीआर रस्त्याऐवजी तिथे निओ मेट्रो केल्याने सार्वजनिक वाह्तुकीलाच प्राधान्य मिळेल आणि खाजगी वाहनांना रस्ता मिळणार नाही अशी स्थिती निर्माण केली जाणार आहे . महापालिकेच्या हद्दींना लगाम न घालता त्या बेफाम पाने वाढवीत राहिल्याने ,बेकायदा बांधकामांना फूस लावून ती भरमसाठ वाढविल्याने पुण्यातील वाहतुकीचा बट्ट्याबोळ झालेला असताना आता निओ मेट्रो हणजे आणखी जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होईल कि काय अशी वाटण्याजोगी स्थिती आहे. महापालिका हद्दीला आणि बेकायदा बांधकामांना लगाम न घातल्याने सध्या सुरु असलेल्या मेट्रोने देखील भविष्यात वाहतुकीचा हा बट्ट्या बोळ तसाच राहणार आहे, एचसीएमटीआर रस्ता झाला तर खाजगी वाहनांना आणखी जागा उपलब्ध होणार आहे . आणि निओ मेट्रो झाली तर मात्र केवळ सार्वजनिक वाह्तुकीलाच जागा मिळणार आहे असे सांगण्यात येते आहे.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर अभय छाजेड यांनी अजितदादांना पत्र दिले असून या पत्रात त्यांनी असे म्हटले आहे कि, १९८७ च्या विकास आराखड्यात हा रस्ता आहे.हा रस्ता विकसित करण्यासाठी महापालिकेने टेंडर देखील काढले आहे. टेंडर जादा रकमेचे आल्याने पालिकेने ते रद्द केले आहे. पण हा रस्ता विकसित करताना तो पालिकेने २४ मीटर रुंदीचा प्रस्तावित केलेला आहे.यामध्ये  ८ मीटर सार्वजनिक वाहतुकीला मिळणार आहे. मात्र १७ जानेवारीच्या बैठकीत एच सी एम टी आर ऐवजी निओ मेट्रोचा प्रस्ताव दिला गेला .म्हणजेच येथे केवळ ८ मीटर चा रस्ता होईल . शहरामध्ये वाहनांची संख्या वाढतेय पण रस्ते वाढत नाही अशी अवस्था असताना एच सी एम टी आर  रद्द करू नये .तो करावाच . आणि निओ मेट्रोचा विचार करण्यात येवू नये अशी विनंती छाजेड यांनी या पत्रातून अजितदादांना केली आहे.

  • आबा बागुलांचा हि विरोध –

पुण्याच्या अंतर्गत वाहतुकीवर असणारा ताण  लक्षात घेऊन १९८७ च्या विकास आराखड्यात नोंदवलेला एचसीएमटी मार्ग २०१७ च्या विकास आराखड्यात अंतिम मान्य करण्यात आला. याचे कंसल्टंट,एस्टीमेट,डीपीआर व टेंडर या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज वर्तमान पात्रातून एचसीएमटी  चा नियोजित मार्ग २४ मी ऐवजी ८ मी म्हणजेच ८० फुटाऐवजी २४ फूट करण्याचे लक्षात आले. हि बाब पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने निश्चितच योग्य ठरणार नाही. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी गेली १५ वर्षे सातत्याने पाठपुरावा करीत असून ८० टक्केहुन अधिक भूसंपादन मार्गिकेसाठी  पूर्ण झाले आहे. आता मात्र या प्रस्तावित मार्गाची रुंदी २४ मी ऐवजी ८ मी केल्याने वाहतुकीचा जटिल प्रश्न सुटण्यास मदत होणार नाही उलट हि प्रक्रिया करण्यात डीपी मध्ये बदल करावे लागतील त्यासाठी पुन्हा मुख्यसभेची व इतर सर्व मान्यता घ्याव्या लागतील यासाठी खूप मोठा कालावधी जाईल प्रकल्पाची किंमतही वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही योग्य वेळी सदर मार्ग पूर्ण झाला नाही तर भूसंपादन केलेल्या जागा पुन्हा जागा मालकांना द्याव्या लागतील. भविष्याचा विचार केल्यास मार्गाची रुंदी २४ मी ठेवणे योग्य व सोईचे होईल त्यामुळे भविष्यात पुन्हा भूसंपादन करणेस जागा राहणार नाही. काँग्रेस पक्षाने या प्रस्तावित मार्गावर २ मेट्रो मार्गका व ४ मेट्रो मार्गिका वाहनांसाठी नियोजित केल्या होत्या आता मात्र हा प्रस्तावित मार्ग २४ ऐवजी ८ मीटर झाल्याने जुन्या पुण्याच्या हद्दीतील वाहतूक कोंडी सुटण्यास कशी मदत होईल त्यामुळे  २०१७ च्या विकास आराखड्यानुसार मंजूर झालेला एचसीएमटीआर मार्ग पूर्ववत २४ मीटर रुंदीचा ठेवावा हे पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक असल्याने याचा पुनर्विचार करून ८ मीटर करू नये अशी मागणी काँग्रेस पक्षातर्फे मी करत असून या संदर्भात पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना समक्ष भेटून या संदर्भांत हा प्रस्तावित मार्ग २४ मी ऐवजी ८ मीटर रुंदीचा करू नये अशी विनंती करणार आहोत. कृपया या संदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून या प्रकल्पाचा पुनर्विचार होऊ नये यामुळे पुणे शहराचा वाहतुकीचा प्रश्न जटिलच होईल या बाबत आयुक्तांनी राज्य सरकारला शिफारस करून पुणेकरांची  वाहतुकीच्या समस्येतून कायमची सुटका करावी अशी विनंती पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...