शहर पातळीवरील काही कॉंग्रेस नेतेमंडळीनी आघाडीत बिघाडी होण्याचीच भूमिका घेतल्याने अखेर निवडणुकीला सामोरे जावे लागले– प्रशांत जगताप
पुण्यात राष्ट्रवादी – शिवसेना आघाडीचा विजयी जल्लोष: कॉंग्रेस मात्र अलिप्त- काय म्हणाले , राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमीलन पीएमआरडीए निवडणुकीच्या निकालात दिसून आले असून, आगामी काळातही ते दिसून येईल, यात काही शंका नाही. मात्र, कार्यकर्ते, नगरसेवक यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून स्वत:चेच मत त्यांच्यावर लादणाऱ्या काँग्रेसच्या काही नेत्यांमुळे काँग्रेस या आघाडीचा भाग होऊ शकली नाही,याची निश्चितच खंत वाटते. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडीचा विजयी जल्लोष सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसला आत्मचिंतन करावे लागत आहे, याचेही आम्हाला निश्चितच एक मित्रपक्ष म्हणून वाईट वाटते अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली आहे. असेराष्ट्रवादीचे प्रसिद्धी प्रमुख यांनी पाठविलेल्या डिजिटल प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे . या विजया बद्दल बोलताना प्रशांत जगताप म्हणाले कि,’ दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते, सर्व विजयी उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांचे नगरसेवक व कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मन:पूर्वक अभिनंदन. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल निश्चितच आमचा उत्साह दुणावणारा आहे.पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील संख्याबळानुसार नियोजन समितीच्या एकूण २२ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे सात व शिवसेनेचा एक असे आघाडीचे आठही उमेदवार विजयी झाले आहेत. आमचे मार्गदर्शक शरद पवार , राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,आमचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख व माजी मंत्री सचिनअहिर, राष्ट्रवादी व शिवसेनेचे पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील गटनेते, शहरप्रमुख आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो.
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी झालेली ही ‘पीएमआरडीए’ नियोजन समितीची निवडणूक महत्त्वपूर्ण होती. त्यामुळे, राज्यात एकत्रित सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जावे, अशी भावना पक्षाचे वरिष्ठ नेते, नगरसेवक व कार्यकर्त्यांची होती. काँग्रेसचे संख्याबळ पाहता एकही उमेदवार विजयी होणार नसल्याचे निश्चित होते. त्यामुळे, काँग्रेसने उमेदवार उभा करू नये, अर्ज माघारी घ्यावा, यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह आम्हीही आग्रही विनंती करीत होतो. मात्र, शहर पातळीवरील काही नेतेमंडळीनी आघाडीत बिघाडी होण्याचीच भूमिका घेतल्याने अखेर निवडणुकीला सामोरे जावे लागले. बुधवार, दि. १० नोव्हेंबर रोजी झालेल्या या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून, यात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडीचे सर्व आठ उमेदवार विजयी झाले आहेत.
आगामी पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल निश्चित आमचा उत्साह दुणावणारा आहे. तसेच, हा निकाल आगामी निवडणुकीतील विजयाची नांदी आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमीलन या निवडणुकीच्या निकालात दिसून आले असून, आगामी काळातही ते दिसून येईल, यात काही शंका नाही. मात्र, कार्यकर्ते, नगरसेवक यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून स्वत:चेच मत त्यांच्यावर लादणाऱ्या काँग्रेसच्या काही नेत्यांमुळे काँग्रेस या आघाडीचा भाग होऊ शकली नाही, याची निश्चितच खंत वाटते. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडीचा विजयी जल्लोष सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसला आत्मचिंतन करावे लागत आहे, याचेही आम्हाला निश्चितच एक मित्रपक्ष म्हणून वाईट वाटते. परंतु, या निकालाने राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार शहर पातळीवरील नेत्यांनी, नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी जी एकी दाखवून दिली, ती निश्चितच यापुढेही यशस्वी, विजयी वाटचालीची ठरेल, यात काही शंका नाही.

दरम्यान पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) नियोजन समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडीचे संख्याबळानुसार आठ उमेदवार विजयी झाले आहेत.एकही जास्त उमेदवार निवडून आलेला नाही . मात्र आजच्या या विजयासाठी या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन जल्लोष केला . महापालिकेत फटके फोडले, गुलाल उधळला.कॉंग्रेसजण मात्र इकडे फिरकले नाहीत .यावेळी प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रिया देताना पहा नेमके ते काय म्हणाले …

