पुणे- महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणताना सावित्रीबाईंनी अनेक संघर्षांचा सामना करत स्त्री शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवली. समाजसेवेचे व्रत अंगीकारून स्त्री सक्षमीकरण व अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. समाजोद्धारासाठी झटणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष रमेश बागवे, महिला काँग्रेस अध्यक्षा पुजा आनंद यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी माजी आमदार दिप्ती चवधरी, माजी महापौर रजनी त्रिभुवन, इंदिरा अहिरे, वाल्मिक जगताप, सुनिल शिंदे, एस.के. पळसे, मुन्नाभाई शेख, राजेंद्र पेशने, विठ्ठल गायकवाड, अनिस खान, सुविधा त्रिभुवन आदी उपस्थित होते.

