महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावा काँग्रेस पक्षाने दिलेला ठराव सर्वसाधारण सभेत एक मताने मंजूर

Date:


पुणे-जेष्ठ समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले आणि देशात स्त्री शिक्षणाचा पाया  रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न सन्मानाने गौरविले जावे. असा ठराव पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत करून केंद्र व राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. अश्या पद्धतीने महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा असा ठराव करणारी पुणे महानगरपालिका देशातील पहिली महानगरपालिका असावी. हा ठराव पुणे महानगरपालिकेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी मांडला आणि सर्वच पक्षांनी एक मतांनी तो मंजूर केला त्या सर्वांचे आभार मानले  अशी माहिती काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांनी दिली. 
आबा बागुल म्हणाले की , यापूर्वी थोर शिक्षणतज्ञ् महर्षी  धोंडो केशव कर्वे व स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी या पुणेकर दिग्गजांना भारतरत्न पुरस्काराने गौरविले गेले आहे.  महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेले अवर्निणय कार्य लक्षात घेऊन  महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे पुणेकरांचे विशेष भावनिक नाते  आहे. त्यांचे राहते घर राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन केले गेले आहे. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले गेले आहे. पुणे महानगरपालिकेत देखील महात्मा ज्योतिराव फुले यांचे देखणे आकर्षक स्मारक करण्यातही मी पुढाकार घेतला होता.  महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे उचित स्मारक पुण्यातच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्रात व देशात उभारले गेले आहे. त्यांच्या नावे शिष्यवृत्या देखील दिल्या जातात. मात्र भारतरत्न देऊन त्यांना गौरविले गेले नाही. हे लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न दिले जावे. असा ठराव पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मी काँग्रेस पक्षातर्फे मांडला व तो एक मताने मंजूर झाला ही आनंदाची बाब आहे. आता हा ठराव केंद्र व राज्य सरकारकडे पाठवला आहे. महाराष्ट्र सरकारने देखील याबाबत आवश्यक ती शिफारस केंद्र सरकारकडे करावी. व केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेऊन भारतरत्न या दोघांना जाहीर करावे. अशी आमची विनंती असून या दोघांनाही भारतरत्न दिला गेल्यास देशातील हे पहिले पती पत्नी भारतरत्न सन्मानाने सन्मानित पती पत्नी असतील हे देखील एक वेगळे वैशिट्य असेल.  त्यांना भारतरत्न दिल्यास कोट्यवधी सामाजिक समानतेच्या सैनिकांना मोठे बळ मिळेल व सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने हे फार मोठे  कार्य असेल असे मत आबा बागुल यांनी व्यक्त केले .  

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

येरवडा कारागृहात 5 मोबाईल,2 पॉवर बँक,चार्जिंग वायर सापडली..

पुणे- येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न...

माझी गाणी आजही रसिकांच्या पसंतीत -सिनेगीतकार समीर अंजान

'एमआयटी एडीटी' विद्यापीठाच्या 'पर्सोना महोत्सवा'ची उत्साहात सांगता लोणी-काळभोर (पुणे)...

अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग दहा वर्षे विजेतेपदाची परंपरा कायम!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा दणदणीत विजयपिंपरी : पुणे आंतर कचेरी...