रायपुर –
रायपूर येथे झालेल्या धर्म संसदेत गांधीजींचा अपमान करणाऱ्या तथाकथित संत कालीचरण यांच्यावर रायपूरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मोहन मरकाम यांनी ‘ढोंगी बाबा हाय..हाय…’च्या घोषणा दिल्या.कालीचरण यांच्यावर IPC च्या अजामीनपात्र कलम 505(2) अंतर्गत शांतता भंग करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह विधाने करणे, समुदायांबद्दल द्वेष निर्माण करणे आणि कलम 294 अंतर्गत अश्लील अपमानास्पद भाषण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सिव्हिल लाइन्सचे CSP वीरेंद्र चतुर्वेदी यांनी सांगितले की, मोहन मरकम यांचा अर्ज पोलिस ठाण्यात कारवाईसाठी पाठवण्यात आला आहे. इकडे, वादग्रस्त विधान केल्यानंतर लगेचच कालीचरण महाराष्ट्रात रवाना झाले.कालीचरण यांच्यावर FIR दाखल करण्यासाठी आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मरकाम म्हणाले, गांधींचा अपमान हा देशाचा अपमान आहे. रविवारी रात्री उशिरा सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या महापालिकेचे अध्यक्ष प्रमोद दुबे यांच्या अर्जाच्या आधारे टिकरापारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रायपूरमध्ये दोन दिवस चाललेल्या धर्मसंसदेचा समारोपाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. रावणभट मैदानावर आयोजित या कार्यक्रमात मध्य प्रदेशातील भोपाळजवळील भोजपूर मंदिरात शिव तांडव स्त्रोत्र गाऊन प्रसिद्ध झालेल्या संत कालीचरण यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. कालीचरण मंचावर आले आणि त्यांनी प्रथम शिव तांडवा स्त्रोत्र गायले.

