तो काय सोडतोय, आम्हीच त्याला हकालले ; ज्योतिरादित्यांवर कॉंग्रेसचा प्रहार

Date:

भोपाळ : कर्नाटकनंतर मध्य प्रदेशमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्तासंघर्षातून ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा ट्विटरवर पोस्ट केला आहे. याच्या काही मिनिटांनंतरच काँग्रेसने खेळी खेळत सिंधियांना धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे.

सिंधियांनी नुकतेच राजीनाम्याचे पत्र काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना ट्विटरवर पोस्ट केले. हे पत्र न स्वीकारताच काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल यांनी सिंधियांनी पक्ष विरोधी कारवाया केल्यामुळे पक्षाने त्यांची हकालपट्टी केल्याचे जाहीर केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ज्योतिरादित्य सिंधियांच्या हकालपट्टीवर मंजुरी दिली असून तात्काळ प्रभावाने त्यांना पक्षातून काढून टाकण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

सोमवारी सिंधिया यांच्या गटाचे 17 आमदार विमानाने बेंगळुरूला गेले आहेत. यामुळे मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार डळमळीत झाले होते. यातच कमलनाथ यांनी 26 पैकी 22 मंत्र्यांचे राजीनामे घेत नव्याने मंत्रीमंडळ स्थापन करण्याची खेळी खेळली होती. सिंधिया यांच्या गोटामध्ये 6 मंत्री होते. मात्र, आज सिंधिया यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर बाहेर येत त्यांनी थेट दिल्लीतील निवासस्थान गाठले. याचवेळी त्यांनी सोनिया गांधी यांना 9 मार्चच्या तारखेचे राजीनामा पत्र ट्विटरवर पोस्ट केले.

दरम्य़ान, सिंधियांच्या गटातील 19 काँग्रेस आमदारांनी राजीनामे पाठविले असून या आमदारांना बेंगळुरुतील रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कॅम्पसमधूनच राजकारणाची नवी पिढी निर्माण होईल:खासदार अनुराग सिंह ठाकूर

१५ व्या भारतीय छात्र संसदेचा समारोप. पुणे, २३ फेब्रुवारी: धोरणनिर्मिती,...

स्पा सेंटरवर कारवाई; बिल्डिंगवरून उडी मारल्याने महिलेचा मृत्यू, पुरुष जखमी

पुणे- विमानतळ परिसरातील अहिल्यानगर रोडवरील सिटी स्पेस बिल्डिंगमधील ‘द...

विमान अपघातात प्रचंड वाढ:आता एअर ॲम्ब्युलन्स क्रॅश, सर्व जणांचा मृत्यू

रांचीहून दिल्लीला जात होते विमानरांची- झारखंडहून दिल्लीला जाणारे एक...