पुणे-पुण्याच्या कॉंग्रेस भवनातला आनंदोत्सव ..पहावा असा ..आणि अनुभवावा असाच ठरला . नांदेड महापालिकेत कॉंग्रेसला मिळालेल्या यशाची बातमी येथे धडकताच कॉंग्रेस भवनाचे आवार गर्दीने फुलून गेले. शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे दुपारी येथे येताच कार्यकर्त्यांनी एकाच जल्लोष केला . पेढे वाटले, नाचले … फटाके फोडले .. आणि ‘नांदेड तो झाकी है ..गुजरात अभी बाकी है ..’ च्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या .माजी आमदार मोहन जोशी , रोहित टिळक,नगरसेवक अविनाश बागवे, अजित दरेकर, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगीता तिवारी, तसेच सोनाली मारणे, विठ्ठल थोरात ,पीएमटी चे माजी अध्यक्ष चंद्रशेखर कपोते तसेच लतेंद्र भिंगारे,राजू साठे ,आयुब पठाण ,संदीप मोकाटे , विकी खन्ना ,आदी असंख्य कार्यकर्ते या आनंदोत्सवात सहभागी झाले होते .
यावेळी माध्यमांशी बोलताना अध्यक्ष रमेश बागवे यांनी , नांदेड पासून भाजपला संपवायला कॉंग्रेसने सुरुवात केली असल्याचे सांगितले . अशोक चव्हाण आणि सर्वच कॉंग्रेस नेत्यांनी केलेले प्रयत्न ,राहुल गांधींच्या बाबत वाढलेल्या जन आशा .. आणि भाजप सरकारने केलेली जनतेची फसवणूक यामुळे हा विजय मिळाल्याचे बागवे यांनी सांगितले . या विजयाचे वारे राज्यभर आणि देशभर पसरेल असेही ते म्हणाले .
पहा कॉंग्रेस भवनातील बहार … (व्हिडीओ)