पुणे -शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात तसेच शिंदे – फडणवीस सरकारच्या वीज दरवाढीच्या विरोधात दिपबंगला चौक, शिवाजीनगर येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना काँग्रेस नेते दत्ता बहिरट म्हणाले की, ‘‘केंद्रातील मोदी सरकारने सर्व सामान्यांच्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढविण्याची सुपारी घेतली असून आधीच महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना घरगुती गॅसचे ५० रू. वाढवून आपल्या जाहिरातीचा पैसा सर्वसामान्यांकडून वसूल करण्याचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारमधील आमदारांचा सुरत, गुवाहाटी व गोव्याचा खर्च वसूल करण्यासाठी वीज दरवाढ करण्यात आली आहे. केंद्र व राज्य सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात असून केवळ जाहिरातबाजी, सरकार पाडण्यात व टिकविण्यात मशगुल असून गॅस दरवाढ व वीज दरवाढ याच्याशी त्यांना काहीही देणे घेणे नाही.’’
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, गोपाळ तिवारी, लता राजगुरू, अजीत दरेकर, मनीष आनंद, वैशाली मराठे, नीता रजपूत, संगीता तिवारी, पुजा आनंद, चंद्रशेखर कपोते, रमेश अय्यर, सचिन आडेकर, राजेंद्र शिरसाट, द. स. पोळेकर, राजेंद्र भुतडा, सुजित यादव, अजित जाधव, सेल्वराज ॲन्थोनी, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, ॲड. राजश्री अडसुळ, शिलार रतनगिरी, राहुल तायडे, सुंदरा ओव्हाळ, शानी नौशाद, नुरूद्दीन सोमजी, नारायण पाटोळे, जावेदभाई निलगर, अमर गायकवाड, अनिता धिमधिमे, रवि पाटोळे, शाबीर खान, आयुब पठाण, संतोष आरडे, अविनाश अडसूळ, प्रकाश पवार, बाळासाहेब प्रताप, सचिन भोसले, संगिता रूपटक्के, चाँदबी शेख, शकिला भाभी, सचिन बहिरट, बाबा सय्यद, राहुल भोसले, भारत पवार, गणेश साळुंके, राजेश जाधव, गणेश गुगळे आदींसह काँग्रेस पदाधिकारी व असंख्य महिला, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
केंद्र सरकारने केलेली गॅस दरवाढ व राज्य सरकारने केलेली वीज दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन.
Date:

