…महाराष्ट्राला आपला सार्थ अभिमान!

Date:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राष्ट्रीय पदक विजेत्यांचे अभिनंदन

महाराष्ट्र पोलीस दलाला ७ शौर्य, ४ राष्ट्रपती पोलीस पदकांसह ५१ पदके

अग्निशमन सेवेतील शौर्यासाठी राष्ट्रपती पदक बाळू देशमुख यांना मरणोत्तर जाहीर

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उत्कृष्ट कामगिरीसाठीची पदके जाहीर

मुंबई, दि. २५ : – भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या औचित्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दलातील कामगिरीसाठी पदक विजेत्यांची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्र पोलीस दलाने ७ शौर्य पोलीस पदक, ४ विशिष्ठसेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक आणि ४० गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक पटकाविले आहे. तसेच महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील सात अधिका-यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. या सर्वांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.

“…महाराष्ट्राला आपला सार्थ अभिमान आहे,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी या सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. या सर्वांची कामगिरी महाराष्ट्राचा गौरव वाढवणारी असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यानी या सर्व पदक विजेत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यांच्या या कामगिरीसाठी पाठबळ देणाऱ्या कुटुंबियांप्रतिही आदर व्यक्त केला आहे.

अग्निशमन सेवेतील रक्षक बाळू देशमुख यांना शौर्यासाठी सर्वोच्च असा ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ मरणोत्तर जाहीर झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रतिही मुख्यमंत्र्यांनी कृतज्ज्ञता व्यक्त करून, दिवंगत देशमुख यांच्या स्मृतींना वंदन केले आहे.

महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी गोपाळ उसेंडी, महेंद्र कुलेटी, संजय बकमवार, भारत नागरे, दिवाकर नरोटे, निलेश्वर पड, संतोष पोटावी यांना शौर्य पोलीस पदक तर अतिरिक्त पोलीस महासंचालक विनय कारगांवकर, एसआरपीएफचे कमांडट प्रल्हाद खाडे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुंडगे, पोलीस उपनिरिक्षक अन्वरबेग मिर्झा यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. याशिवाय महाराष्ट्र पोलीस दलातील ४० अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पोलीस पदक जाहीर झाले आहे.

प्रशांत रणपिसे
किरण गावडे,
बाळू देशमुख

महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील अग्निशमन रक्षक बाळू देशमुख यांना सर्वोच्च शौर्यासाठी मरणोत्तर ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांना विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. याशिवाय उत्कृष्ट सेवेसाठी मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, अग्निशमक सुरेश पाटील, संजय म्हामूणकर, चंद्रकांत आनंददास यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...