पुणे दि.22:-उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड अंतर्गत घेण्यात येणा-या पक्की अनुज्ञप्ती चाचणी करीताच्या ऑनलाईन अपॉईंटमेंटचा प्रतिक्षा कालावधी कमी करण्याच्या उददेशाने तसेच ज्या अर्जदारांची शिकाऊ अनुज्ञप्तीची सप्टेंबर 2021 महिनाअखेर पर्यंत संपत आहे, त्यांच्या करिता या विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
अर्जदारांनी नोंद घ्यावी व त्याप्रमाणे उपलब्ध ऑनलाईन अपॉईंटमेंट घेण्याची कार्यवाही पुर्ण करावी. 23 व 24 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 15 वाजता ऑनलाईन अपॉईंटमेंट उपलब्ध होईल. त्या अनुषंगाने (स्लॉट बुकींग करुन) माहे सप्टेंबर 2021 मधील 25 व 26 सप्टेंबर 2021 रोजी पक्की अनुज्ञप्ती चाचणी करीता सकाळी 8 ते 10 या वेळेत हजर रहावे.
पक्की अनुज्ञप्ती करीता उपलब्ध कोटा 80 असून कोटा उपलब्ध होण्याची वेळ व दिनांक 25 सप्टेंबर 2021 रोजीचा कोटा 23 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 15 वाजता, उपलब्ध कोटा 80 करीता 26 सप्टेंबर 2021 रोजीचा कोटा 24 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 15 वाजता. तरी संबंधित सर्व अर्जदारांनी चाचणीकरीता येताना चेहऱ्यावर मास्क व हँण्ड ग्लोव्हज घालणे बंधनकारक आहे. तसेच सोशल डिस्टंन्सींगचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असेही पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
शनिवार, रविवारी पक्की अनुज्ञप्ती चाचणी करीता विशेष शिबीराचे आयोजन
Date:

