नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2022
मलेशियामधील क्वांतन हवाई तळावर 16 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय हवाई दल आणि मलेशियाचे रॉयल मलेशियन हवाई दल यांच्यातील ‘उदारशक्ती’ या द्विपक्षीय संयुक्त सरावाचा समारोप झाला.
चार दिवस सुरु असलेल्या या सरावादरम्यान, अनेक प्रकारच्या तसेच पद्धतींच्या सराव संचात सादर केलेल्या संयुक्त हवाई लढाऊ कसरतींच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या हवाई दलांनी परस्पर सहयोगाचे दर्शन घडविले.या सरावात सहभागी झालेल्या सर्व जवानांनी घडविलेले उच्च श्रेणीच्या व्यावसायिकतेचे दर्शन हे या सरावाचे वैशिष्ट्य ठरले.
53WZ.jpeg)
‘उदारशक्ती’ संयुक्त सरावाने दोन्ही देशांच्या हवाई दल कर्मचाऱ्यांना परस्परांच्या हवाई दलातील उत्कृष्ट पद्धतींची माहिती सामायिक करण्याची संधी मिळाली. सरावाचा समारोप करताना पारंपरिक समारोप समारंभासह सुखोई-30एमकेआय आणि सुखोई-30एमकेएम या प्रकारातील सात विमानांनी हवाई तळावरील आकाशात हवाई कसरती केल्या. भारतीय हवाई दलाचा ताफा आता पिच ब्लॅक-22 या संयुक्त सरावात सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या डार्विन शहराकडे रवाना होणार आहे.
(1)5J28.jpeg)