पुणे-महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालयाचे पुणे विभागीय पर्यटन कार्यालयामार्फत दि. १ सप्टेंबर २०२२ ते दि. ७
सप्टेंबर २०२२ या गणेशोत्सव कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मुर्तीचे दर्शन ज्येष्ठ नागरिक यांना
घेता यावे यासाठी ‘गणपती दर्शन’ सहलीचे आयोजन करण्यात आले होते. याचा समारोप शनिवार दि. ७ सप्टेंबर रोजी
शनिवारवाडा येथे करण्यात आला.
“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत” वय ६० वर्षे व त्याहून अधिक वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांकरिता पुणे शहरातील
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मुर्तीचे दर्शन घेता यावे यासाठी पुणे विभागीय पर्यटन कार्यालयामार्फत
आयोजित करण्यात आलेल्या ‘गणपती दर्शन’ सहल आयोजनासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने ५ वातानुकूलीत
बसेस व वाहनचालक विनाशुल्क उपलब्ध करुन दिले होते. यावेळी या बसेसच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांनी कसबा,
तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशी बाग, केसरी वाडा, भाऊ रंगारी, श्रीमंत दगडूशेठ, शारदा गणपती या सार्वजनिक
गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मुर्तीचे दर्शन घेण्याचा लाभ जेष्ठ नागरिकांना मिळाला. या ‘गणपती दर्शन’ सहलीचा समारोप
शनिवारवाडा येथे करण्यात आला. यावेळी सुप्रिया करमरकर-दातार,सहाय्यक संचालक विभागीय पर्यटन कार्यालय,दत्तात्रय झेंडे, चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत पुणे महानगरपालिका व ‘पीएमपीएमएल’च्या सहकार्याने गेल्या
आठवड्यापासून ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रथमच गणपती दर्शन कार्यक्रम आयोजित होता. यासाठी पीएमपीएमएल’चे मा.
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक साहेबांच्या आदेशानुसार वातानुकूलीत ५ बसेस विनाशुल्क देण्यात आल्या होत्या. या
कार्यक्रमांतर्गत १ हजार पेक्षा अधिक जेष्ठ नागरिकांनी गणपती दर्शनाचा लाभ घेतला. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मा.
मंगल प्रसाद लोढा यांनी राज्यातील ४ शहरांमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता, परंतु केवळ सर्वोत्तम प्रतिसाद आणि
व्यवस्था वरील सर्व विभागांनी केल्याचे पर्यटन विभागाने सांगितले व ‘पीएमपीएमएल’चे प्रशस्तीपत्र देऊन आभार
मानले”.
- दत्तात्रय झेंडे, चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) .