कन्सेप्ट नाईनने आणला नवा ज्वेलरी ब्रॅन्ड ‘मेहविश’
पुणे – कन्सेप्ट नाईन, ट्रिनिटी मोटर्स, मर्सिडी ज बेंझ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेहविश’ या नव्या ज्वेलरी ब्रॅन्डचे अनावरण करण्यात आले. ‘मेहविश’च्या दागिन्यांच्या प्रदर्शनासाठी पुण्यात एका फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये लागू बंधू व अडरिस्या यांचाही समावेश होता. या फॅशन शोच्यावेळी मोठ्या संख्येने पुण्यातील नामांकित ज्वेलर्स व्यावसायिक होते.
‘मेहविश’द्वारे नव्या शैलीचे दागिने पुणेकरांना मिळणार आहेत. पुण्यात कधीच न झालेला एकमेवाद्वितीय असा मेहविश शो पुण्यातील ग्राहकांसाठी पर्वणी आहे. हा शो म्हणजे फक्त सुरुवात असून मे महिन्यात दोनदिवसीय शो करण्यात येणार आहे. त्यावेळी काही महत्त्वाचे ज्वेलरी ब्रॅन्ड आपला सहभाग नोंदवणार असल्याचे कन्सेप्ट नाईनच्या सोनिया राव यांनी सांगितले.