पुणे, : कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया च्या वतीने २१ व्या आंतरराष्ट्रीय डेटा व्यवस्थापन परिषद (सी ओ एम ए डी ) चे आयोजन पुण्यातील पर्सिस्टंट सिस्टिम्स लि, हिंजवडी फेज १, येथे ११ ते १३ मार्च दरम्यान करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय डेटा व्यवस्थापन परिषद ही आंतराष्ट्रीय स्तरावरील अग्रणी डेटाबेस परिषद आहे. ही संशोधनावर केंद्रित असेल आणि वक्त्यांमध्ये काही उद्योगविश्वातील काही तज्ञांचा ही समावेश असेल.
आंतरराष्ट्रीय डेटा व्यवस्थापन परिषडदेच्या कार्यक्रम समितीचे अध्यक्ष आयआयटी मद्रास चे डॉ. बलराम रवीन्द्रन व मेरीलॅंड विद्यापीठातील सायन्स पार्कचे डॉ. अमोल देशपांडे असणार आहेत. परिषदेत अनेक महत्वाच्या वक्त्यांची भाषणे होणार आहेत. यामध्ये क्रेट विद्यापीठाच्या इलेक्ट्रोनिक व संगणक अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक मिनोस गारोफलाकीस, गूगल येथील वरिष्ठ संशोधक, रवी कुमार, आय आय टी मुंबईच्या संगणक शास्त्र आणि अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक, कृती रामामृतम, नान्यांग विद्यापीठाच्या स्कूल ऑफ कम्प्युटर इंजिनीरिंग मधील सहाय्यक प्राध्यापक अरिजित खान यांचा समावेश आहे.
असोशिएशन फॉर कम्प्युटिंग मशिनरी (ACM ) व IKDD यांच्या वतीने आयोजित तिसरी डेटा सायन्स विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद (CoDS ) चे आयोजनही पुण्यात १३ ते १६ मार्च या दरम्यान करण्यात आले आहे. डेटा सायन्स विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे पहिले दोन संस्करण (२०१४ व२०१५ ) यशस्वी ठरले. २०१५ च्या परिषदेला या उद्योगातील तसेच या विषयातील २०० अभ्यासकांनी सहभाग नोंदवला. डेटा सायन्स विषयावरील परिषद संशोधनावर केंद्रित असेल. यामध्ये शोधनिबंध, लघुनिबंध तसेच पोस्टर पेपर सादरीकरण यांचा समावेश आहे. तसेच परिषेदत आमंत्रित विद्यार्थ्यांचे’डेटा चॅलेंज’ या विषयावरील चर्चासत्र तसेच या उद्योगातील डेटा सायन्स चॅलेंज या विषयावरील तज्ञाचे मार्गदर्शनपर सत्र होणार आहे. यामध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या बर्कले च्या कम्प्युटर सायन्स विभागातील प्राध्यापक पीटर बार्टलेट, कार्नेगी मेलन विद्यापीठातील प्राध्यापक एडवर्ड होवे, लीन्कडइन चे दीपक अग्रवाल व मिनेसोटा विद्यापीठातील प्राध्यापक विपिन कुमार यांचा सहभाग असेल.
यावेळी ही परिषद डेटा व्यवस्थापन परिषदेशी (सी ओ एम ए डी ) जोडून येणार आहे व १३ मार्च २०१६, हा एक दिवस या दोन्ही परिषदांसाठी एकत्रअसेल. या परिषदेत, विद्यार्थी, संशोधक आणि उद्योग विश्वातील तज्ञांना एकत्र येऊन विचारांची देवाण घेवाण करण्याची दुर्मिळ संधी प्राप्त होईल.