मुंबई,दि.६: पर्यटन विभाग, इंडियन ऑईल आणि बृहन्मुंबई महापालिकेने गेट वे ऑफ इंडिया येथील ‘ध्वनी आणि प्रकाश शो’ चे काम नियोजित वेळेत पूर्ण करावेत असे निर्देश पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
गेट वे ऑफ इंडियावर ‘ध्वनी आणि प्रकाश शो करण्याच्या दृष्टीने पर्यटन विभागाने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) सोबत नुकताच करार केला आहे.या कराराच्या अनुषंगाने काम पुर्ण होण्याबाबत मंत्रालय येथे आयोजित बैठकीत पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते.यावेळी पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय,पर्यटनचे संचालक बी.एन.पाटील,पर्यटन सहसंचालक डॉ.धनंजय सावळकर,सहसचिव उज्वला दांडेकर,इंडियन ऑईलचे कार्यकारी संचालक यु.पी.सिंह,ब्रॅण्डिंगचे कार्यकारी संचालक संदीप शर्मा,महाव्यवस्थापक अनिल मिश्रा, उपमहाव्यवस्थापक विजय गवारे,मुंबई महापालिकेचे कार्यकारी अभियंता पुरात्तत्व विभाग संजय सावंत,सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे,उपसचिव विलास थारोत उपस्थित होते.
मंत्री श्री.लोढा म्हणाले, पर्यटन विभागाने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) सोबत गेटवे ऑफ इंडिया येथे ध्वनी आणि प्रकाश शो उजळण्यासाठी सामंजस्य करार नुकताच केला. या शोमुळे गेट वे ऑफ इंडिया येथे भेट देणा-या पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल. शिवाय स्थानिक संस्कृती देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना देखील माहिती होईल.मुंबई महापालिकेतंर्गत करण्यात येणारी कामे ऑक्टोंबर पूर्वी पूर्ण करण्यात यावीत.तसेच इंडियन ऑइल मार्फत करण्यात येणारी कामे देखील नियोजित वेळेत पूर्ण करावीत.यासाठी पर्यटन विभागाने सर्व परवानग्या घ्याव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

