माध्यम व पत्रकारिता परिषदेच्या दुसर्या दिवशी वक्त्यांचा सुर
पुणे-:“कम्युनिटी रेडिओ हे सामुदायिक एकतेसाठी हे अत्यंत महत्वाचे साधन आहे. तसेच, जनतेमध्ये जागृती आणणे व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी हे प्रभावी माध्यम आहे. ग्रामीण क्षेत्रातील महिला व मुलींच्या मनातील कोविड वॅक्सिन संदर्भातील दुविधा स्थिती दूर करण्यासाठी यांची भूमिका महत्वाची होती. तसेच क्षेत्रिय भाषा, संस्कृती आणि परंपरेची जोपासना याच्या माध्यमातून होतांना दिसत आहे.” असा सुर उपस्थिती वक्त्यांनी काढला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे आयोजित ऑनलाईन,“तिसर्या राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेच्या” दुसर्या दिवशी आयोजित ‘दळवणवळण आणि विश्वास निर्माण करण्यासाठी कम्युनिटी रेडिओ’ या विषयावरील सत्रात ते बोलत होते.
यावेळी हैदराबाद विद्यापीठातील संप्रेषण विभागाचे व युनेस्को चे कम्युनिटी मीडियाचे अध्यक्ष प्रा. विनोद पावराल, हरियाणा येथील गुडगांव की आवाज समुदाईक रेडिओची संचालिका आरती जैमन, म्हसवड येथील माण देशी तरंग वाहिनी कम्युनिटी रेडिओच्या आरजे केराबाई, गुजरात येथील एसईडब्ल्यूए, रुडी नो रेडिओ, अकादमीच्या संचालिका नम्रता बाली, संचालक आणि बिहार, ९०. एफएम, रेडिओ, मयूर येथील मुख्य परिचालन अधिकारी अभिषेक अरुण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, स्कूल ऑफ मिडिया अॅण्ड जर्नालिझमचे संचालक धिरज सिंग हे उपस्थित होते.
प्रा.विनोद पावराल म्हणाले,“या रेडिओंमुळे तरुणांच्या मनात विश्वास निर्माण होत आहे. हे सामुदायिक एकतेसाठी अत्यंत महत्वाचे साधन आहे. हे माध्यम अत्यंत जिकरिचे असून कोणतेही उत्पादन बनविण्यापेक्षा कठिण कार्य आहे.”
आरती जैमन म्हणाल्या,“ शहरी आणि ग्रामिण संस्कृतीला घेऊन चालणारे आहे. यांच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे रेडिआ हे सर्वांच्या जिव्हाळ्याचे व आठवणीची जागा आहे.”
अभिषेक अरुण म्हणाले,“शिक्षण, शेती, संस्कृतीसारखे विविध कार्यक्रमांची निर्मिती करुन ते समाजापर्यंत पोहविल्या जाते. याच्या माध्यमातून जनतेला व्यवहाराची भाषा शिकवितो. तसेच लोकांच्या घरातील व त्यांचे वैयक्तीक समस्या सोडविण्यासाठी ही कार्य करतो.”
आपले विचार मांडतांना केराबाई व नम्रता बाली म्हणाल्या, मातृभाषेतून गाण्याच्या माध्यमातून जनतेचे मनोरंजन व त्यांच्या समस्या सोडविण्यावर अधिक भर देतो.
धिरज सिंग यांनी प्रास्ताविक केले.
प्रा. पोर्णिमा बागची व प्रा. चयणिका बासू यांनी सूत्रसंचालन केले.
फेक न्यूज मुळे लोकशाही धोका निर्माण होऊ शकतो
माध्यमांतील शांती प्रसारकः तथ्य तपासक आणि फेक न्यूज बस्टर्स, या विषयावरील चर्चासत्रात माजी केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला म्हणाले, फेक न्यूज मुळे लोकशाहीला सर्वात मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी सोशल मिडियाची जवाबदारी खूप मोठी आहे. परंतू वॉटएप, ट्विटर, फेसबूक यांच्या माध्यमातून पत्रकारितेचे तथ्य पाळले जातांना दिसत नाही. बातम्यांची सत्यता पडताळूनच प्रकाशित करावी. तसेच समाजाला नुकसान होणार नाही याचे भान ठेवण्याची गरज आहे.
त्यानंतर मातृभूमीचे प्रमुख फॅक्ट चेकिंग शजन कुमार, बूमलाइव्हचे संस्थापक गोविंदराज एथिराज, पत्रकार व प्रा. जतीन गांधी आणि ज्येष्ठ पत्रकार परजॉय गुहा ठाकूरता यांनी समयोचित विचार मांडले.

