आयुक्तसाहेब .. या १४०० कोटीची वसुली कधी होणार ?

Date:

महारथीं (?) कडून १४००  कोटीचे येणे-महापालिकेच्या मिळकतकर विभागावर दबाव कुणाचा ?

पुणे- किरकोळ,किरकोळ विकास कामांसाठी लाख २ लाख  नाही नाही म्हणणाऱ्या पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाची ५० लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ६७८ मिळकतकर धारकांची यादी बाहेर काढण्यास नगरसेवक महेश वाबळे आणि आरती कोंढरे यांना यश आले आहे. विशेष म्हणजे या ६७८ लोकांकडे एकूण १३९७ कोटी ८४ लाख ५९हजर ३८० रुपये येणे थकलेले असून यात सर्वात वरचा क्रमांक ज्याचा लागतो तो स्वतःला एक समाजसेवी म्हणून मिरविणारा चित्रपट क्षेत्रात उधळण करणारा  असल्याचे समजते आहे , ज्याच्या  मालमत्तेचा  मिळकत कर विभागाला  तब्बल १४८ कोटी ५ लाख ३० हजार २४० रुपये येणे आहेत .विशेष म्हणजे याच्यासह पाच  नामवंत असे आहेत कि एकूण थकबाकी पैकी ५०० कोटीची थकबाकी यांच्याकडे  आहे. आणि या वसुलीसाठी दिनांक ११ फेब्रुवारी पर्यंत तरी महापालिकेने काहीही यशस्वी  कार्यवाही केलेली नसल्याने आणि  आयुक्त विक्रमकुमार किंवा  मिळकतकर विभाग प्रमुख विलास कानडे यांनी स्वतः हून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण न दिल्याने त्यांच्या कार्यपद्धती शंका उपस्थित करणारी  मानली जाऊ शकणार आहे.  विशेष म्हणजे या अर्थसंकल्पापूर्वी शेवटच्या वर्षासाठी अवघ्या २४६ कोटी च्या वर्गीकरणासाठी स्थायीला विशेष मेहनत घ्यावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर हि वसुली करण्यात का यश आले नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अभय योजनेत हि प्रकरणे घेतली किंवा नाही याचीही माहिती समजू शकलेली नाही .
विलास कानडे हे महापालिकेतील मनमिळाऊ, अनुभवी अधिकारी मानले गेले आहेत आयुक्त कार्यालयापासून जकात प्रमुख अशा विविध महत्वपूर्ण जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत . ते सध्या मिळकत कर विभाग प्रमुख आहेत . महापालिकेच्या उत्पन्नाचे जे मुख्य स्त्रोत तिथे त्यांनी काम केलेले आहे. असे असताना त्यांनी आपल्या कारकिर्दीत ५०  कोटीच्या वर थकबाक्या  कशा होऊ दिल्या , त्यांच्यावर कोणी दबाव आणला हे प्रश्न उपस्थित होऊ शकतात .खरे तर कोरोनाच्या काळात महापालिकेला   आर्थिक चणचण आहे  असे सांगत विकास कामाना कात्री लावणाऱ्या   महापालिकेला नगरसेवक महेश वाबळे आणि आरती कोंढरे यांनी ५० लाखाच्या वरील थकबाकीदारांची माहिती १२ ऑक्टोबर २० रोजीच मागविली होती .ती यादी तब्बल ११ फेब्रुवारी रोजी या विभागाने तयार केली आणि आत्ताशी कुठे ती बाहेर माध्यमांपर्यंत पोहोचली आहे. कोण आहेत हे  थकबाकीदार …थकबाकीदारांची नावे देताना मिळकत कर विभागाने  चलाखी करत हे लोक शक्यतो  स्पष्ट होणार नाहीत अशा पद्धतीने अर्धवट नावे देत तयार केली आहेत . या चौघांची नावे प्रथम पाहिली तर पहिले नाव जे आहे ‘साई कंसट्रक्शन केअर ऑफ बालन एस ‘ एवढेच दिले आहे. ज्यांच्याकडे १४८ कोटी ५ लाख ३० हजार २४० रुपयांची थकबाकी दाखविली आहे. त्यांचा पत्ता स. नं. १०/A +१० B +११ +12B+४४७/३/१+४४८/२+४४९ F PT No 100+101 part -1 CIVIL LINE, राजाबहादूर मोतीलाल रोड पुणे १  असा दिलेला आहे. 
दुसरा थाबकीदार जो आहे त्याचे नाव आहे. ह्युजेस इस्पात इस्पात लि.OCC NO.1,S.NO.5 फायनल प्लॉट नं 803,शिवाजी नगर पुणे ५ . ज्यांच्याकडे १२४ कोटी ४५ लाख ६९ हजार ५०९ रुपये दाखविण्यात आली आहे. तिसरा थकबाकीदार आहे सिंहगड  टेक्निकल इंसी . ज्यांच्या मिळकतींचे पत्ते वेगवेगळे आहेत प्रत्येक मिळकतीवर वेगवेगळी थकबाकी आहे ती एकत्र केल्यास सुमारे १०५ कोटी रुपयांपर्यंत ती पोहोचते .आणि चौथा थकबाकीदार अॅॅमनोरा ज्याच्या विविध मालमत्तांचा कर ६५ कोटीच्या घरत थकलेला आहे. आणि पाचवा थकबाकीदार  खुद्द खडकवासला पाटबंधारे विभाग आहे ज्यांच्याकडे ५८कोटीची थकबाकी आहे. लता मंगेशकर मेडिकल फौडेशन कडे सुमारे १० कोटी रुपयांची थकबाकी आहे. असे असताना त्यांच्या हॉस्पिटलला कोरोनाच्या काळात काही कोटी रुपये महापालिकेनेच अदा केलेत हे विशेष मानावे लागेल. ब्रह्मा बजाज हॉटेल (राजाबहादूर मोतीलाल रोड ,पुणे )यांच्याकडे ५ कोटी १२ लाखाची थकबाकी आहे .पॅॅनकार्ड  क्लब ,बाणेर यांच्याकडे साडेचार कोटी रुपये थकबाकी आहे.पी वाय सी  हिंदू जिमखाना कडे ४ कोटी ३१ लाख  रुपये थकबाकी आहे.पुना कंसट्रक्शण कडे सुमारे ६ कोटी रुपये थकबाकी आहे. केवळ इंजिनिअर नावाने स. नं १०ब+१४ अ +१६   अ +१७अ प्लॉट नं २ येरवडा पुणे ६ यांच्याकडे १ कोटी ३२ लाखाची थकबाकी दाखविण्यात आली आहे.आणि पुन्हा एका नोंदीनुसार ७९लकहचि थकबाकी दाखविण्यात आली आहे. म्हणजे केवळ इंजिनिअर या नावानेच उल्लेख आहे.सतीश मगर यांच्याकडे १कोटी ५ लाखाची थकबाकी आहे.भारती एअरटेल कंपनीकडे ९६ लाखाची थकबाकी आहे. पुन्हा आणखी एका ठिकाणी यांच्या नावे ६९ लाखाची थकबाकी आहे. गोयल गंगा डेव्हलपर्स कडे ९४ लाख १४ हजार ६२५ रुपयांची थकबाकी आहे. 
खुद्द पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे ८९ लाखाची थकबाकी आहे.डेक्कन एज्युकेशन कडे ८८ लाखाची थकबाकी आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती कडे ६७ लाखाची थकबाकी आहे. अतुल चोरडियाकडे ५८ लाखाची थकबाकी आहे. विशेष म्हणजे पुणे महानगरपालिका (४२७ ,डी/४ ,गुलटेकडी पुणे ३७ ) या नावे ५८ लाखाच्या  थकबाकीची नोंद आहे. हॉटेल चॉइस प्रा. ली कोथरूड पुणे , यांच्याकडे ५१ लाखाची थकबाकी आहे. कात्रजच्या दुगड यांच्याकडे ५० लाख ४४ हजार एवढी थकबाकी आहे. ओसवाल बंधू समाज यांच्याकडे १५  कोटीहून अधिक थकबाकी आहे. रोझरी एज्युकेशन ग्रुप ,स. नं १०७/१अ /१+१०८/१ब /१४ रोझरी स्कूल ,आदित्य गार्डन जवळ वारजे पुणे यांच्याकडे २ कोटी २७ लाखाची थकबाकी आहे. न्यू क्लासिक असोसिएट,हाउस नं. १२५४ , स. नं. २२ बालाजीनगर , धनकवडी ,पुणे यांच्याकडे २ कोटी १९ लाखाची थकबाकी आहे. दौलत कंसट्रक्शण कंपनी ,दौलत सोसायटी,कोथरूड पुणे ३८ यांच्याकडे १ कोटी ६लाख ५६ हजार २४७ रुपयांची थकबाकी आहे. ममता दीपक मिसाळ ,स. नं ७४/७ ,१०,११, १२,१३  वडगाव बु . पुणे ४१ यांच्याकडे ९३ लाख ३२ हजार ७०७ एवढी थकबाकी आहे. कराड विश्वनाथ (मॅॅनेजिंग ट्रस्टी ,एम आय टी )यांच्याकडे ७७ लाख ५९ हजार २९९ रुपये थकबाकी आहे. सुरेखा अरुण मेमाणे स. नं २,१०८१  धनकवडी यांच्याकडे ५४ लाख ५५ हजाराची थकबाकी आहे तर त्यांच्याकडेच १०८३ /१ धनकवडी येथील ५४ लाख ३० हजाराची थकबाकी आहे .सावरकर भवन मधील साई सेल्स आणि सर्व्हिस कडे ५७ लाखाची थकबाकी आहे . ललितकुमार जैन के के मार्केट यांच्याकडे ५३ लाखाची तर भानुदास तुकाराम निम्हण केअर ऑफ ललितकुमार जैन यांवे स. नं १३०/२ पाषाण या नावे ६१ लाखाची थकबाकी आहे.  एकूण ६७८ मिळकत धारकांकडे असलेल्या एवढ्या मोठ्या थकबाकीची वसुली करण्यात प्रशासन का कमी पडले आणि ती कधी कशी करणार याचे उत्तर अर्थात आयुक्त विक्रम कुमार यांनीच देणे अपेक्षित असल्याचे मानले जाते .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...