Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कमिशनर साहेब,हे घ्या ..हेल्मेटच्या ‘सक्ती ‘ला विरोध करणारे हे भाजपच्या संदीप खर्डेकरांचे तुम्हाला खुले -जाहीर पत्र ..आता तुम्ही कराल खुला जाहीर खुलासा ?

Date:

प्रती,

मा.के वेंकटेशम,
पोलीस आयुक्त,पुणे.
विषय – हेल्मेट सक्तीचा विषय पोलिस नागरिक संघर्षाचा नाही….सर्वोच्च न्यायालयात पुण्यातील परिस्थिती/वस्तुस्थिती मांडावी…हेल्मेट नसल्यास पेट्रोलपंपावर पेट्रोल मिळणार नाही या वक्तव्याबाबत ही कृपया खुलासा करावा….
मा.महोदय,
आपण केलेल्या हेल्मेट सक्तीच्या घोषणेनंतर पुण्यातील राजकीय सामाजिक वातावरण ढवळुन निघाले आहे व विविध संस्था, संघटना,राजकीय पक्ष व सामान्य पुणेकर आंदोलनाच्या तैयारीत आहे.हेल्मेट सक्ती हा विषय पोलिस आणि नागरिक यांच्यातील  संघर्षाचा नाही हे पहिले समजून घेतले पाहिजे.हा विषय संवेदनशीलतेने हाताळण्याचा असून त्यात अतिरेकी भूमिका ही सुखावह नाही.
आज वाहतूक पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांचे एका वृत्तपत्रातील विधान आगीत तेल ओतणारे असून  “कोणत्या कायद्याने पोलिस हेल्मेट न वापरणाऱ्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळु देणार नाहीत ” असा सवाल पुणेकर विचारत आहेत.( अर्थात मी मा सातपुते मॅडम यांच्याशी संपर्क केला असता असे विधान केले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे ) पण मला वाटते की याबाबतीत पुणेकरांच्या भावना तीव्र असून,प्रत्येक वेळी हेल्मेट सक्ती चा विषय पुढे आणताना पोलिसांकडून सर्वोच्च न्यायालयाचा दाखला दिला जातो.मात्र पुण्यातील गत १५ वर्षात या सक्ती विरोधात झालेली आंदोलने ,पुण्यातील परिस्थिती,येथील प्रचंड अशी २७ लाख दुचाकींची संख्या आणि हेल्मेट सक्ती बाबत पुणेकरांनी मांडलेले व्यवहार्य मुद्दे….हे सगळे पुणे पोलिसांनी न्यायालयात मांडल्यास निश्चित पणे मेहेरबान न्यायाधीश महोदय प्राप्त परिस्थितीत पुण्याला या सक्तीतून वगळू शकतात.सर्वोच्च न्यायालयापुढे पुणेकरांची बाजू व्यवस्थितपणे मांडले गेले पाहिजे.
तसेच मा पोलिस उपायुक्त वाहतूक यांच्या हेल्मेट आणि पेट्रोल विक्री चा संबंध जोडणाऱ्या विधानाबाबत ही योग्य खुलासा करावा ही विनंती.
काही मुद्दे खाली देत आहे….
*विरोध हेलमेट सक्तीला – ज्याने त्याने स्वेच्छेने हेलमेट वापरावे*
काही मंडळींचे असे म्हणणे आहे की अपघातात अनेक लोक मृत्युमुखी पडतात – हेल्मेट मुळे अनेक जीव वाचतील…
मुळात नागरिकांचे मत आहे की *चार चाकीतून फिरणारे दुचाकी वाल्यांच्या डोक्यावर हेल्मेट लादू इच्छितात* माझे साधे आवाहन आहे की *परिवहन मंत्री/पोलिस आयुक्त/वाहतूक पोलिस उपायुक्त/विभागीय आयुक्त/मनपा आयुक्त व अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केवळ एक महिना आपल्या आलिशान गाड्या बाजूला ठेवुन दुचाकी वरुन हेल्मेट घालून शहरात फिरावे* – मग त्यांना त्याचा नेमका त्रास काय होतो ते समजेल……
मुळात पुण्यासारख्या शहरात जेथे दुचाकीचा वेग ताशी ३० किमी पेक्षा जास्त नाही तेथे हेल्मेट अभावी अपघातात माणसे दगावतात हा जावईशोध कोणी लावला ? आणि मग *An Accident also known as an Unintentional injury ,is an Undesireable,incidental and an Unplanned Event* आणि मग अपघात तर बस कार कश्याचा ही होवु शकतो, मग बस मधे हेल्मेट घालुन बसले तर जीव वाचतील ? ज्येष्ठ नागरिक हे घरात आणि त्यातूनही स्नानगृहात पडण्याचे प्रमाण मोठे आहे / मग त्यांनी चिलखत घालुन फिरावे काय ? मला माहिती आहे की हा तर्क वाह्यात आणि अनावश्यक आहे पण मग हेल्मेट वापरा अशी सक्ती करणारे तरी काय तर्क देत आहेत ?
माझ्या साध्या प्रश्नाचे उत्तर द्यावे पोलिस आयुक्तांनी – *पुण्यात २७ लाखांपेक्षा जास्त दुचाकीस्वार त्यात साधारण ५/१० लाख डबल सीट,दर्जेदारआय एस आय मार्क ५० लाख हेल्मेट उपलब्ध आहेत का* ? रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या हेल्मेटच्या दर्जाचे काय ? त्याने जीव वाचेल ? हजारो महिला आपल्या लहान मुलांना दुचाकीवरुन शाळेत सोडतात – *या महिलांनी हेल्मेट वापरलेच पाहिजे जीव महत्त्वाचा – मग मागे बसलेल्या किंवा पुढे उभे राहणाऱ्या चिमुकल्यांचे काय ?* त्यांच्या मापाचे हेल्मेट आहेत ? ते त्यांच्या मानेला पेलवतील ? आणि सायकल स्वार / पादचारी हे ही अपघातात मरतात – मग त्यांना ही सक्ती करायची ? हेल्मेट अभावी २११ लोक मृत्यूमुखी पडले…. *दारु / तंबाखु / सिगारेट सेवनाने तर हजारो मरतात ? मग त्याला बंदी नको – बंदीनंतर ही गुटखा सहजगत्या उपलब्ध आहे – हे अपयश कोणाचे* ? रस्त्यावरील हातगाड्यांभोवती /पदपथांवर जागोजागी रात्री दारु पिणारे दिसतात तर जागोजागी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे ही आढळतात/ हा ही कायद्याने गुन्हा आहे ना ? मग तेथे जेथे ह्या सेवनाने हजारो मरतात तेथे पहिले कारवाई प्रबोधन गरजेचे आहे असे आपणांस वाटत नाही का ? का सामान्य दुचाकीचालक पुणेकर हे Soft Target असल्याने तो लक्ष्य ?
विविध कंपन्या/शासकीय कार्यालये/शाळा /कॉलेज येथे गेल्यावर हेल्मेट ठेवायचे कुठे हे सांगून टाका ? का कोणतेही संयुक्तिक कारण नसताना आणि हेल्मेट सक्तीचा गत १० वर्षांचा पुण्यातील आंदोलनाचा इतिहास माहिती असताना पुणेकरांना चीड वाटावी,शहरातील शांत वातावरण ढवळुन निघावे,चौकाचौकात वाहतूक पोलिस आणि नागरिक यांच्यात वादावादी व्हावी यासाठी हा उद्योग ?
हेल्मेट वापरामुळे मान दुखीचा त्रास होतो /शेजारुन वाहन गेलेले दिसत नाही / side view block होतो / हॉर्न ऐकु येत नाही / असे एक ना अनेक विषय आहेत …. हेल्मेट सक्ती अव्यवहार्य असून हेल्मेट हा स्वेच्छेने वापरण्याचा विषय आहे…..साहेब आपण अपघात होवु नयेत यासाठीच प्रयत्न करु ना –  *दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा वाहतूक पोलिसांनी चौकात थांबून वाहतूक नियमन केले ना तर निम्मे प्रश्न सुटतील वाहतूकीचे*
मी ह्या सक्तीच्या निर्णयाला विरोध असण्याचे शेकडो कारणे सांगू शकतो…..पण सर्वात महत्त्वाचे आहे ते प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असल्याने हा विषय ज्याच्यात्याच्या सदसदविवेकबुद्धीवर सोडावा हेच श्रेयस्कर…..
*संदीप खर्डेकर*
अध्यक्ष क्रीएटिव्ह फौंडेशन….
मो ९७५०९९९९९५
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भविष्याची भक्कम पायाभरणी: १,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी एलपीएफ शिष्यवृत्ती मिळाली

पुणे, : “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये...

भारतातील लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत..अनंत गाडगीळ

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी...