गांधी जयंतीनिमित्त फिट इंडिया फ्रीडम रन 3.0 चा प्रारंभ

Date:

नवी दिल्ली-

गांधी जयंतीनिमित्त आज रविवारी सकाळी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदानात (स्टेडियममध्ये) फिट इंडिया फ्रीडम रन 3.0 ला प्रारंभ झाला.  कोविड-19 महामारीचा  मोठ्या प्रमाणावर प्रसार होत होता,   तयावेळी म्हणजे 2020 मध्‍ये  केन्द्र सरकारने  या सर्वात मोठ्या देशव्यापी चळवळींपैकी एक असलेल्या मोहिमेची सुरुवात केली होती.

केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू तसेच केंद्रीय मंत्री युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी संयुक्तपणे चालवलेल्या फिट इंडिया- प्लॉगसह या दौडची सुरुवात  करण्यात आली. फिट इंडिया फ्रीडम रनचं हे तिसरं वर्ष असून आज, २ ऑक्टोबरला सुरू  झालेली ही दौड ३१ ऑक्टोबरपर्यंत चालेल.

माजी केन्द्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन गोयल, क्रीडा सचिव सुजाता चतुर्वेदी, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक संदीप प्रधान, फिट इंडियाचे सदिच्छादूत रिपू दमन बेवली तसेच क्रीडा मंत्रालय आणिक्रीडा प्राधिकरणाचे-  ‘साई’चे इतर अधिकारी आणि लोक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते.

पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचा पुनरुच्चार करत किरेन रिजिजू यांनी नमूद केले की, “ नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया चळवळ सुरू केली, तेव्हा त्यांची ध्येयदृष्टी संपूर्ण देशाला तंदुरुस्त बनवण्याची होती. इतक्या वर्षाने आता या चळवळीला मोठे यश प्राप्त झाले आहे. प्रत्येकजण आता या चळवळीत सामील होण्यास इच्छुक आहे आणि फिट इंडिया मोबाईल अॅप देखील दररोज मोठ्या उत्साहाने डाउनलोड केले जात आहे.”

रिजीजू यांच्याच वक्तव्याचा धागा पकडत अनुराग सिंग ठाकूर यांनी नमूद केले की, “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासून ते अमृतकालापर्यंत, भारताला नवीन उंचीवर नेण्याच्या पंतप्रधानांच्या स्वप्नांसाठी आपल्याला काम करत राहावे लागेल. आपल्या तंदुरुस्तीविषयक सर्व बाबींचा स्तर नव्या उंचीवर नेणे हा त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा पहिला मार्ग आहे.”

यंदाच्या फ्रीडम रनमधे विक्रमी संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ठाकूर यांनी केले. “गांधी जयंतीच्या दिवशी या मलिकेतली ही तिसरी यशस्वी दौड सुरु करून एकता दिवस – अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी 31 ऑक्टोबर रोजी तिचा समारोप करण्याइतका दुसरा चांगला योग नाही. गेल्या वर्षी एकूण 9 कोटी 30 लाख लोक यात सहभागी झाले होते. यंदा ही संख्या  दुप्पट करण्यासाठी आपल्याला फिट फ्रीडम रन 3.0 ला खूप पाठबळ द्यावे लागेल असे ते म्हणाले.”

फिट इंडिया फ्रीडम रनमधे, गेल्या दोन वर्षांत, भारतीय सशस्त्र दलांसह सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), भारतीय रेल्वे, सीबीएसई आणि आयसीएसई शाळा तसेच युवा कार्य मंत्रालयाची युवा शाखा, नेहरू युवा केंद्र संघटना (एनवायकेएस) आणि “राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांनी सहभाग घेतला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...