अमरावती-महात्मा गांधी जींची प्रेरणा घेऊन तरूणांनी देशाच्या विकासासाठी झोकुन देण्याचे आवाहन खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, अमरावतीच्या वतीने महात्मा गाँधी यांच्या जयंती निमित्त गांधीजींच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनीच्या उदघाटन प्रसंगी डॉ. बोंडे बोलत होते.
“मोहनदास ते महात्मा” या गांधीजींच्या जीवन प्रवासावर आधारित चित्रप्रदर्शनिचे आयोजन येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाच्या कला दालनात आज प्रारंभ झाला. या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनिचे उदघाटन खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार प्रविण पोटे, निवासी उपजिलहधिकारी डॉ. विवेक घोडके, क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह झाला, महावितरणचे अधिक्षक अभियंता दिपक देवहाते, संत गाडगेबाबा विदयापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेश बुरंगे अन्य मान्यवर उपस्थित होते.
R9XH.jpeg)
या प्रर्दशनीमध्ये महात्माजींच्या छायाचित्रांसोबतच निवडणुक विभाग, भारतीय डाक विभाग, महानगर पालिका अमरावती, कस्तुरबा सोलर खादी समीती च्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनी स्टॉलचे उदघाटन मान्यवरांनी केले. माहीती प्रसारण मंत्रालयाच्यावतीने लहान मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन गेम्स आजादी क्वेष्ट आणि केंद्र सरकाच्या आठवर्ष पुर्ती निमित्त माहीती पटलाचे उदघाटन देखील करण्यात आले. यानंतर मणिबाई गुजराती विदयलयात घेण्यात आलेल्या चित्रकला आणि निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवंराच्या हस्ते बक्षीस आणि प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

गजलकार डॉ. राजेश उमाले यांनी गांधीजींना आवडणारी भजनं गाऊन सर्वांची मने जिंकली.
याप्रदर्शनाच्या उदघाटनापुर्वी राष्ट्रीय सेवायोजनेच्या स्वंयसेवकानी शहरातील इर्वीन चौकात स्वच्छतेवर पथनाटयाचे सादरीकरण केले आणि रॅलीच्या माध्यमतून जनजागृती केली. या रॅलीत विवीध विदयालयाच्या विदयार्थांनी सहभाग घेतला.
दि. 2 ऑक्टोबर ते 04 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनिच्या माध्यमातून लोकांपर्यंत महात्मा गाँधी यांच्या जीवन प्रवाससोबतच त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख होणार आहे. या प्रदर्शनातुन विविध शासकीय विभागांच्या योजनाची माहिती आणि लाभ देण्यात येणार आहे.
दि. 2 ऑक्टोबर ते 04 ऑक्टोबर दरम्यान स.10 ते सांय 6 या वेळेत निशुल्क आयोजित प्रदर्शनीस जनतेने मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन क्षेत्रीय प्रचार अधिकारी इन्द्रवदनसिंह झाला यानी केले आहे.


