Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

फेब्रुवारी 2022 मध्ये एकूण 1,33,026 कोटी रुपये जीएसटी महसूलाचे संकलन

Date:

नवी दिल्‍ली, 1 मार्च 2022

फेब्रुवारी 2022 महिन्यात जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करापोटी एकूण 1,33,026 कोटी रुपये महसूल संकलित करण्यात आला आहे. यामध्ये सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 24,435 कोटी रुपये, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी 30,779 कोटी रुपये, आयजीएसटी Rs 67,471 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवरील करापोटी जमा झालेले 33,837 कोटी रुपये धरून) आणि अधिभार 10,340 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवरील करापोटी संकलित झालेले 638 कोटी रुपये धरून) यांचा समावेश आहे.

सरकारने नियमित सामंजस्य म्हणून आयजीएसटीमधून 26,347 कोटी रुपये सीजीएसटीला आणि 21,909 कोटी रुपये एसजीएसटीला दिले आहेत. सर्व देणी दिल्यानंतर, फेब्रुवारी 2022 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारांना अनुक्रमे सीजीएसटीपोटी 50,782 कोटी रुपये आणि एसजीएसटीपोटी 52,688 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे.

गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात संकलित झालेल्या जीएसटी महसुलापेक्षा फेब्रुवारी 2022 मध्ये 18% अधिक महसूल गोळा झाला आहे तर फेब्रुवारी2020 मधील जीएसटी संकलनापेक्षा या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 26% अधिक जीएसटी संकलित झाला आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये आयात केलेल्या वस्तूंवरील करापोटी 38% अधिक महसूल जमा झाला असून देशांतर्गत व्यवहारांमधून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल गेल्या वर्षी याच महिन्यात याच स्त्रोतांद्वारे संकलित महसुलापेक्षा 12% अधिक आहे.

फेब्रुवारी हा 28 दिवसांचा महिना आहे त्यामुळे दर वर्षीच या महिन्यातील जीएसटी संकलन जानेवारी महिन्यापेक्षा नेहमीच कमी असते हे लक्षात घेतले पाहिजे. या वर्षी 20 जानेवारीच्या दरम्यान देशात आलेल्या ओमायक्रॉन विषाणू संसर्गाच्या लाटेमुळे विविध ठिकाणी लावावी लागलेली अंशतः टाळेबंदी, सप्ताहाच्या शेवटी तसेच रात्री लागलेली संचारबंदी आणि लागू झालेले  इतर प्रतिबंधात्मक नियम या संदर्भात हे फेब्रुवारी महिन्यातील जीएसटी संकलनातील वाढ लक्षात घ्यायला हवी.

या वर्षात पाचव्यांदा मासिक जीएसटी संकलनाच्या आकडेवारीने 1.30 लाख कोटींचा टप्पा पार केला आहे. देशात जीएसटी लागू झाल्यापासून पहिल्यांदाच जीएसटी अधिभार संकलनाने 10,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.यातून अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये आर्थिक व्यवहार विशेषतः वाहन उद्योगातील विक्री पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचे संकेत मिळत आहेत.

फेब्रुवारी 2021 मध्ये महाराष्ट्रात 16,104 कोटी रुपये तर गोव्यात 344 कोटी रुपये जीएसटी महसूल संकलन झाले होते, तर फेब्रुवारी 2022 मध्ये महाराष्ट्रात 19,423 कोटी रुपये तर गोव्यात 364 कोटी रुपये जीएसटी महसुलाचे संकलन झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत या वर्षी फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्राच्या जीएसटी महसूल संकलनात  21%  तर गोव्याच्या महसूल संकलनात 6%ची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

खाली दिलेला तक्ता विद्यमान आर्थिक वर्षातील मासिक जीएसटी महसूल संकलनाचा कल दर्शवितो.

खाली असलेल्या तक्त्यामध्ये फेब्रुवारी 2021 मधील जीएसटी संकलनाच्या तुलनेत फेब्रुवारी 2022 महिन्यातील जीएसटी महसूल संकलनाची प्रत्येक राज्यातील आकडेवारी दिली आहे –

फेब्रुवारी 2022[1] मध्ये झालेली जीएसटी महसूल संकलनातील राज्यनिहाय वाढ

State NameFeb-21Feb-22Growth
Jammu and Kashmir330326-1%
Himachal Pradesh663657-1%
Punjab1,2991,48014%
Chandigarh14917820%
Uttarakhand1,1811,1760%
Haryana5,5905,9286%
Delhi3,7273,9225%
Rajasthan3,2243,4698%
Uttar Pradesh5,9976,5199%
Bihar1,1281,2067%
Sikkim2222220%
Arunachal Pradesh6156-9%
Nagaland3533-6%
Manipur323920%
Mizoram212415%
Tripura63664%
Meghalaya14720137%
Assam9461,0087%
West Bengal4,3354,4142%
Jharkhand2,3212,5369%
Odisha3,3414,10123%
Chhattisgarh2,4532,78313%
Madhya Pradesh2,7922,8532%
Gujarat8,2218,8738%
Daman and Diu30-92%
Dadra and Nagar Haveli23526011%
Maharashtra16,10419,42321%
Karnataka7,5819,17621%
Goa3443646%
Lakshadweep0174%
Kerala1,8062,07415%
Tamil Nadu7,0087,3935%
Puducherry15817813%
Andaman and Nicobar Islands2322-5%
Telangana3,6364,11313%
Andhra Pradesh2,6533,15719%
Ladakh91672%
Other Territory1341361%
Center Jurisdiction12916729%
Grand Total88,10298,55012%

[1] वस्तूंच्या आयातीवरील जीएसटीचा यात समावेश नाही

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज आहे – प्रशांत जगताप

पुणे- होणार… होणार.. म्हणता म्हणता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अखेर...

महायुतीतून पुण्या पिंपरीत अजितदादा कशासाठी बाहेर ? मविआला धोबीपछाड करण्यासाठी ?

पुणे- महापालिका निवडणुका जाहीर होताच आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...