तिसऱ्या लाटेची भीती घालणाऱ्यांना चिंता का नाही -?
पुणे- देशातील सर्व नागरिकांना लस मोफत दिली जाईल अशी घोषणा झाली खरी .सुरुवातीला पहिल्या आणि दुसऱ्या डोस मधील अंतर ही काही दिवसांचेच होते . नंतर ते अंतर ८४ दिवसांचे करण्यात आले. दोन -दोन वेळा लस केंद्रावर जाऊनही लस मिळेल याची शाश्वती मात्र अजूनही कोणालाच उरलेली नाही . ऑनलाईन नोंदणीचा तर तमाशाच तेवढा उरला. अशा पद्धतीने नोंदणी साठी अनेकांनी अविरत परिश्रम घेतले नंतर लस केंद्रांवर हेलपाटे मारण्यास परिश्रम घेतले. ना तिथे सन्मानाने कोणी लस दिली ना कोणी श्रम कमी करण्याचा यत्न केला . अशा अनुभवामुळे आता अनेक नागरिकांना दिलेला पहिला डोस वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे . हि भीती सर्वाधिक कोव्हीशिल्ड घेणाऱ्यांमध्ये जास्त दिसते आहे. महापालिका आयुक्त , जिल्हाधिकारी , विभागीय आयुक्त स्तरावर मात्र या टंचाई ची आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाची कोणतीही दखल घेतली जात नाही हे विशेष .
गेली कित्येक दिवस रोज काही कोव्हीशिल्ड केंद्रांवर येत नाही दिवसा आड येत ती हि आता ३/४ दिवसांनी तर कधी ५/५ दिवसांनंतर येऊ लागली आहे. ऑनलाईन नोंदणी न करता आलेल्यांची संख्या ७० टक्के आहे. मग अशा अवस्थेत स्थानिक नगरसेवकांचा आधार घेऊन त्यांना विनवणी करत पुन्हा काही चकरा मारत लोक दुसरा डोस घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत .दुर्दैवाने राज्य सरकारचे मात्र या प्रकाराकडे अजिबात लक्ष नसल्याचे दिसून आले आहे.
एकीकडे लसीकरण हाच तिसऱ्या लाटेचा सामना करण्याचे प्रमुख हत्यार असताना या गोष्टींकडे का दुर्लक्ष होते आहे हे मात्र कोणाला समजेना अशा अनेक बाबींमुळे नागरिक अखेरीस त्रासलेले आहेत .

