मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रीत झालेल्या गाण्याचे छायाचित्र मीडियावर सध्या गाजते आहे. मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस या उत्तम कलाकार असून गायक म्हणून त्यांची ओळख यापूर्वीच महाराष्ट्राला झाली आहे.
मुलींच्या शिक्षणाबद्दल जाणीव करुन देणाऱ्या मोहिमेतही त्यांचा हातभार आहे. यासाठी ‘न्यूयॉर्क फॅशन वीक’मध्ये त्यांनी रॅम्पवॉक केला होता. लवकरच त्यांचा एक अल्बम प्रकाशित होणार असून यात त्या चक्क अमिताभ बच्चन यांच्यासोबत नृत्य करताना दिसणार आहेत. त्यांचे अल्बममधील छायाचित्र मीडियामध्ये गाजते आहे.
मुंबईतील आलिशान ‘ऑपेरा हाऊस’मध्ये ‘फिर से…’ या गाण्याचे अलिकडेच शूटींग पार पडले. अमिताभनेही आपल्या ट्विटरवर याबाबत लिहिले आहे. विशेष म्हणजे या अल्बममधील गाणे अमृता फडणवीस यांनीच गायिले आहे. यात त्यांची आणि अमिताभ यांची जोडी पाहायला मिळते. यात त्यांचा लूकही खूपच आधुनिक असल्याचे दिसून येते.