पुणे- पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपचा एकहाती सत्तेचा झेंडा फडकल्याने शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांच्या वर्चस्वाला जबरदस्त हादरा बसला आहे , एकूणच मुंबई ,पुणे , पिंपरी येथे भाजपने मारलेल्या जोरदार मुसंडीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.
दरम्यान कोण संजय काकडे ? असा प्रश्न करणाऱ्या शिवसेना अध्यक्ष विनायक निम्हण यांना स्वतःच्या मुलाला निवडून आणण्यात यश आले नाही . अभ्यासक आणि समीक्षक ज्या संजय काकडे यांच्या वक्तव्यांवर हसत होते त्या सर्वांचा त्रिफळा या निकालाने उडविला आहे . ९० ते ९५ जागा आम्ही जिंकू असे संजय काकडे आवर्जून सांगत होते ,दरम्यान पुण्यात ९८ जागांवर भाजपने विजय मिळविला असून राष्ट्रवादीच्या हाती ३८ जागा लागल्या असून शिवसेनेला १0 , कॉंग्रेसला ९ तर मनसे ला अवघ्या २ जागेवर समाधान मानावे लागले आहे .एमआयएम ला एका जागेवर विजय मिळाला ,आणि अपक्ष ४ जागांवर विजयी झाले .
तर पिंपरीतही भाजपला ७८ जागांवर दणदणीत विजय मिळाला असून ,राष्ट्रवादीला येथे अवघ्या ३५ जागांवर समाधान मानावे लागले आहे . शिवसेनेला ९ आणि मनसेला १ जागा येथे मिळाली आहे . अशा पद्धतीने पवार काका पुतण्यांचा सफाया पुण्या पिंपरीत झाला आहे .