मी पुन्हा येईन….मुख्यमंत्री यांचा निर्धार

Date:

मुंबई : महाराष्ट्रासमोरचे प्रश्‍न अनेक आहेत. ते पूर्णत: सुटलेले नाहीत. आव्हाने मोठी आहेत. गेल्या पाच वर्षात अनेक आव्हाने आली. आंदोलने झाली. आरक्षणाचे काही प्रश्‍न मिटले. काही अद्याप तसेच आहेत. पण सर्व प्रश्‍न मिटवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेला विठठलरूप मानत त्यांच्या विकासाच्या वारीत मी सहभागी झालो, असे भावूक उदगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले.

 

अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी `मी पुन्हा येईन/ नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी/ जलयुक्‍त शिवारासाठी/ दुष्काळ मिटवण्यासाठी/ युवामित्रांना शक्‍ती देण्यासाठी  कवितेच्या ओळी सादर केल्या.

अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका कवितेने भाषणाचा समारोप केला.

मी पुन्हा येईन..
याच निर्धारानं, याच भूमिकेत,याच ठिकाणी
नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी…

मी पुन्हा येईन..
गावांना जलयुक्त करण्यासाठी,शहरांचा चेहरा बदलण्यासाठी
माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी
नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी..

मी पुन्हा येईन….
माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनविण्यासाठी
माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी
नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी…
मी पुन्हा येईन….

मी पुन्हा येईन….
याच निर्धारानं,याच भूमिकेत,याच ठिकाणी
प्रत्येक व्यक्तीची साथ घेत, त्याचा हात हाती घेत
माझ्या महाराष्ट्राला एक नवं रूप देण्यासाठी
नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी…
मी पुन्हा येईन….

दरम्यान विरोधी बाकांसह सर्व सदस्यांनी त्यांच्या या उदगाराची    प्रशंसा केली. संविधानाला सर्वोच्च महत्व देत शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अंगीकार करत मी महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेलाच देव मानले असे फडणवीस म्हणाले. आजही महाराष्ट्र सर्व राज्यात अग्रणी असलेले राज्य आहे. ते पुढे नेण्यासाठी सतत प्रयत्न करू असेही ते म्हणाले.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या `कदम मिलाके चलना होगा’ या काव्याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री म्हणाले, की मी प्रत्येकाला समवेत घेवून चाललो. दुष्काळ मिटवण्याचे प्रयत्न केले. गुंतवणूक खेचून आणली, विदर्भातला अनुशेष दूर करण्याचे प्रयत्न केले. मुख्यमंत्रीनिधीचा वापर रूग्णांच्या मदतीसाठी करण्यास प्रारंभ केला. शेतीचे प्रश्‍न सोडवले असेही ते म्हणाले.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिले वहिले  डिजिटल डेटा संकलन आणि स्व-गणना सुविधेसह जनगणना 2027 चा  राष्ट्रीय स्तरावर प्रारंभ

जगातील सर्वात मोठी जनगणना मोहीम, जनगणना 2027 सुरू झाली आहे. भारत सरकारने...

पुण्यात ड्रग विक्री: 250 ते 300 जणांचे रॅकेट,8 आरोपी निष्पन्न

पुणे- पुण्यात २५० ते ३०० जणांचे एमडी ड्रग...

कार्यकारी अध्यक्षपदावरून प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्षपदावरून सुनील तटकरे पदच्युत ? चर्चेचे वादळ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून प्रफुल्ल पटेल आणि...