- क्लब ऑफ महाराष्ट्रच्या जयेश तांबे, डेक्कनच्या यश बोरामणी, केडन्सच्या राझिक फल्लाह यांची अफलातून गोलंदाजी
पुणे, दि.10 फेब्रुवारी 2021- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत केडन्स क्रिकेटअकादमी संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत सलग दुसरा विजय मिळवला. तर, क्लब ऑफ महाराष्ट्र, डेक्कन जिमखाना या संघांनी अनुक्रमे अंबिशियस स्पोर्ट्स क्लब व व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी या संघांचा पराभव करून पहिला विजय नोंदविला.
पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना व नेहरू स्टेडियम मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत ब गटाच्या लढतीत जयेश तांबे(5-13)याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने अंबिशियस स्पोर्ट्स क्लब संघाचा 1 गडी राखून पराभव करत विजय मिळवला. क्लब ऑफ महाराष्ट्र संघाच्या जयेश तांबे(5-13), श्रीयश कोळपकर(2-24), शुभम मेड(1-34) यांनी केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीपुढे अँबिशियस स्पोर्ट्स क्लब संघाचा डाव 41.1षटकात 148 धावावर कोसळला. यात श्रेयस जाधव 66, व्यंकटेश दराडे 18,, जेसल पटेल नाबाद 34 यांनी धावा केल्या. याच्या उत्तरात क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने हे आव्हान 43.4षटकात 9बाद 149धावा करून पूर्ण केले. यात आदित्य घुलेने 34, हर्षल क्षीरसागरने 22, स्वप्निल पठाडेने 20, शुभम मेडने 19 यांनी छोटी पण महत्वपूर्ण खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अंबिशियस स्पोर्ट्स क्लबकडून सरीश देसाईने 23 धावात 4 गडी बाद केले. सामन्याचा मानकरी जयेश तांबे ठरला.
अ गटाच्या सामन्यात यश बोरामणी(40धावा व 2-15) याने केलेल्या अष्टपैलू कमगिरीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघावर 8 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना डेक्कन जिमखाना संघाला 36.2षटकात 149धावापर्यंत मजल मारता आली. यात यश बोरामणी 40 व श्रेयस जीवने 21 यांनी पहिल्या गड्यासाठी 55 चेंडूत 45 धावांची भागीदारी करून संघाला सुरेख सुरुवात करून दिली. हे दोघेही बाद झाल्यावर अथर्व वनवे 31, निकुंज बोबरा 18 यांनी धाव केल्या. व्हेरॉक संघाकडून रोहित चौधरी(4-24), ओम भाबड(2-26), तिलक जाधव(1-32) यांनी गोलंदाजी करत डेक्कनला 149 धावांवर रोखले. या आव्हानाचा पाठलाग करताना व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघ 44.3षटकात 141धावावर आटोपला. यात हर्ष खांडवे 25, यश जगदाळे 23, टिळक जाधव 20 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. डेक्कन जिमखाना अजय बोरुडे(3-23), यश बोरामनी(2-15), प्रज्वल मुंगरे(2-24), श्रेयस जीवने(2-14) यांनी अचूक गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
ब गटाच्या दुसऱ्या सामन्यात राझिक फल्लाह(6-35) याने केलेल्या भेदक गोलंदाजीसह अर्शिन कुलकर्णी(94धावा)याने केलेल्या फलंदाजीच्या जोरावर केडन्स क्रिकेट अकादमी संघाने कम्बाईन डिस्ट्रिक्ट संघावर 3 गडी राखून विजय मिळवला. पहिल्यांदा खेळताना कम्बाईन डिस्ट्रिक्ट संघाने 45षटकात 8बाद 236धावाचे आव्हान उभे केले. यात उबेद खान 86, किरण चोरमाळे 62, प्रथमेश बजारी नाबाद 21, सचिन धास 19 यांनी धावा केल्या. केडन्सकडून राझिक फल्लाहने 35धावात 6 गडी बाद केले. हे आव्हान केडन्स संघाने 42.5 षटकात 7बाद 239धावा करून पूर्ण केले. यामध्ये अर्शिन कुलकर्णीने 74चेंडूत 11चौकार व 5 षट्काराच्या मदतीने 94 धावा, अथर्व धर्माधिकारीने 47धावा यांनी पहिल्या गड्यासाठी 87चेंडूत 98 धावांची भागीदारी केली. त्यानंतर कौशल तांबेने नाबाद 30धावा, प्रद्युम्न चव्हाणने 28धावा, आर्य जाधवने 17धावा करून संघाचा विजय सुकर केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी: गट अ: डेक्कन जिमखाना: 36.2षटकात सर्वबाद 149धावा(यश बोरामणी 40(58,4×4,1×6), अथर्व वनवे 31(47,4×4), श्रेयस जीवने 21(23), निकुंज बोबरा 18(15), रोहित चौधरी 4-24, ओम भाबड 2-26, तिलक जाधव 1-32) वि.वि. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 44.3षटकात सर्वबाद 141धावा(हर्ष खांडवे 25(43,3×4), यश जगदाळे 23(37,3×4), टिळक जाधव 20(41,1×4), अजय बोरुडे 3-23, यश बोरामनी 2-15, प्रज्वल मुंगरे 2-24, श्रेयस जीवने 2-14);सामनावीर-यश बोरामणी; डेक्कन जिमखाना संघ 8 धावांनी विजयी;
गट ब: कम्बाईन डिस्ट्रिक्ट: 45षटकात 8बाद 236धावा(उबेद खान 86(99,11×4, 2×6), किरण चोरमाळे 62(83,6×4), प्रथमेश बजारी नाबाद 21(31,1×4), सचिन धास 19, राझिक फल्लाह 6-35, आर्या जाधव 1-53, प्रद्युम्न चव्हाण 1-37) पराभूत वि.केडन्स: 42.5 षटकात 7बाद 239धावा(अर्शिन कुलकर्णी 94(74,11×4,5×6), अथर्व धर्माधिकारी 47(46,7×4), कौशल तांबे नाबाद 30(36,2×4,1×6), प्रद्युम्न चव्हाण 28, आर्य जाधव 17, प्रथमेश बजारी 3-37, किरण चोरमाळे 2-28); सामनावीर-राझिक फल्लाह; केडन्स संघ 3 गडी राखून विजयी;
गट ब: अँबिशियस स्पोर्ट्स क्लब: 41.1षटकात सर्वबाद 148 धावा(श्रेयस जाधव 66(109,5×4), व्यंकटेश दराडे 18(31), जेसल पटेल नाबाद 34(47,4×4), जयेश तांबे 5-13, श्रीयश कोळपकर 2-24, शुभम मेड 1-34) पराभूत वि.क्लब ऑफ महाराष्ट्र: 43.4षटकात 9बाद 149धावा(आदित्य घुले 34(66,3×4), हर्षल क्षीरसागर 22(26,3×4), स्वप्निल पठाडे 20(36), शुभम मेड 19, सरीश देसाई 4-23, व्यंकटेश दराडे 2-41, ऋषिकेश बारणे 1-13); सामनावीर-जयेश तांबे; क्लब ऑफ महाराष्ट्र संघ 1 गडी राखून विजयी.

