गडकरींशी चर्चा होईपर्यंत 8 दिवस पुण्यातील वाहनांना टोल नाही -आंदोलक व खा. सुप्रिया सुळे भेटणार गड़करींना-खेड़ शिवापूर टोल नाका

Date:

पुणे-सातारा महामार्गावरील खेडशिवापूर येथे टोलनाका हटाव कृती समितीच्या वतीने ‘टोल हटाव’ आंदोलन आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी टोलनाक्यावर तब्बल दोन तास अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. या  आंदोलनात भाजपचे आमदार भिमराव तापकीर सहभागी झाले होते . नितीन गडकरींनी किमान आपल्या येथील आमदाराचे तरी ऐकावे आणि खेड शिवापूर टोल नाका बंद करावा अशी मागणी आता खा. सुप्रिया सुळे थेट गडकरी यांच्या कडे करणार आहेत.केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पुढील आठ दिवसात चर्चा करून टोलनाका पी एम आर डी ए च्या हद्दीबाहेर हटविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत पुणे शहराबरोबर  खड़कवासला,भोर, वेल्हा, हवेली, पुरंदर, व मुळशी तालुक्यातील वाहने मोफत सोडण्यात येतील असे कृती समितीच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. यानंतर दुपारी एक नंतर खेड शिवापूर टोल नाक्यावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली आहे. या ठिकाणी हजारोंच्या संख्येने आंदोलनकर्ते उपस्थित होते.

स्थानिक आमदारांना मध्यस्थानी ठेवून त्यांचे प्रश्न विचारात घेत सुप्रिया सुळे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. देशाचे रस्ते आणि वाहतूक विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याशी या संदर्भात बैठक घेऊन तोडगा काढू, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

सकाळी दहा ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सुरू असलेल्या आंदोलनात रिलायन्स इन्फ्रा व एन एच ए आय च्या अधिकाऱ्यांनी स्थानिक प्रतिनिधी व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

स्थानिक प्रवाशांनाही टोल आकारला जात असल्याने याचा त्रास हा आर्थिक रुपात सहन करावा लागतो. हे टाळण्यासाठी भोर ,वेल्हा आणि मुळशी या भागातील प्रवाशांसाठी दोन  मार्गिका मोफत करण्याचे आश्वासन हे एन.एच.आय. घ्या, अधिकाऱ्यांनी दिलं आहे.

खेडशिवापूर टोलनाका ताबडतोब बंद करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी
खेडशिवापूर हा टोलनाका भ्रष्टाचाराचे कुरण ठरला आहे. ही टोलवसुली काम अपूर्ण असल्यामुळे 1 जानेवारी 2014 पासून बंद व्हायला हवी होती. मात्र, ती सुरू ठेवून गेल्या 9 वर्षांत तब्बल 1780 रुपयांची लुबाडणूक जनतेकडून ठेकेदाराने केली आहे. मार्च 2013 पर्यंत या रस्त्याला 6 पदरी करण्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. पण, 2020 उजाडल्या नंतरही हे काम प्रलंबित आहे त्यामुळे हा टोलनाका ताबडतोब बंद करण्यात यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

येरवडा कारागृहात 5 मोबाईल,2 पॉवर बँक,चार्जिंग वायर सापडली..

पुणे- येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न...

माझी गाणी आजही रसिकांच्या पसंतीत -सिनेगीतकार समीर अंजान

'एमआयटी एडीटी' विद्यापीठाच्या 'पर्सोना महोत्सवा'ची उत्साहात सांगता लोणी-काळभोर (पुणे)...

अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग दहा वर्षे विजेतेपदाची परंपरा कायम!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा दणदणीत विजयपिंपरी : पुणे आंतर कचेरी...