कचरावेचकांसमवेत आगळी वेगळी दिवाळी साजरी
पुणे :
क्लिन गार्बेज मॅनेजमेंट प्रा.लि., जीवित नदी, माय अर्थ, गायत्री परिवार आणि टीएए सागरमित्र अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने 25 कचरावेचकांसमवेत दिवाळी साजरी करण्यात आली. माणिकबाग, सिंहगड रोड या परिसरात दारोदारी जाऊन कचरा गोळा करणार्या कचरावेचकांना दिवाळी संसारउपयोगी भेटवस्तु आणि मिठाई देण्यात आली.
यावेळी सागरमित्र अभियानाचे विनोद बोधनकर, क्लिन गार्बेज चे ललित राठी, विलास पोकळे, ‘माय अर्थ’चे अनंत घरत, गायत्री परिवाराचे शैलेंद्र पटेल, श्री. शिंदे, जीवित नदीचे निरंजन उपासनी, अनील सिंग, प्रकाश म्हस्के आदी उपस्थित होते. यावेळी कचरावेचकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.
‘गोळा होणार्या दररोजच्या 1 टन ओल्या व सुक्या कचर्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करता येऊ शकेल’, असे ललित राठी म्हणाले.