चित्रनगरीतील अनधिकृतपणे ताब्यात असलेली उपहारगृहाची जागा निष्कासित करण्याचे आदेश शहर दिवाणी न्यायालयाकडून कायम

Date:

मुंबई, दि. 26 : दादासाहेब फाळके चित्रनगरी ही चित्रिकरणासाठी एक आदर्श जागा म्हणून चित्रनगरीकडे पाहिले जात आहे. चित्रिकरणात सहभागी होणाऱ्या सर्व घटकांना आवश्यक असणाऱ्या सुविधा चित्रनगरीतच उपलब्ध करुन देण्याचा महामंडळाचा सुरुवातीपासूनच कल आहे. या पार्श्वभूमीवर कलाकार/सहकलाकार, सेट उभारणीसाठी येणारे तंत्रज्ञ,मजूर यांना अल्पोपहाराची सोय उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महामंडळाच्या परिसरात कॅन्टीनची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येते.

श्री. लक्ष्मण गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाने सन 1995 मध्ये 1012 चौ.फुट जागा रु.1518 या नाममात्र दराने 5 वर्षासाठी दिली होती. तद्नंतर पूर्वी दिलेल्या जागेत वाढ करुन सन 2001 मध्ये एकूण 1932चौ.फुट एवढी जागा 10 वर्षासाठी करारनाम्याद्वारे भाडेतत्वावर देण्यात आली होती. सदर करारनामा हा द्विपक्षीय सहमतीवर आधारित असून करारनाम्यास मुदतवाढ द्यावयाची झाल्यास ती दोन्हीं पक्षांच्या सहमतीवर अवलंबून राहील अशी स्पष्ट तरतूद करारनाम्यात होती. तथापि, करारातील तरतुदीचे पालन न करता श्री. गायकवाड यांनी जागा सोडण्यास करण्यास नकार दिला.

श्री. गायकवाड यांच्याकडे असलेली जागा ताब्यात घेण्यासाठी महामंडळाने कायदेशीर मार्गाचा अवलंब करत सक्षम प्राधिकारी, बृहन्मुंबई यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. सक्षम प्राधिकारी यांनी त्यांच्या दि. 03.04.2013 रोजी दिलेल्या आदेशान्वये प्रफुल फास्ट फुड यांना जागेमधून निष्कासित करण्याचे आदेश दिले. सदर आदेशाविरुद्ध श्री.गायकवाड यांनी सन 2013 मध्ये मा.शहर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली. मा. दिवाणी न्यायालयाने श्री. गायकवाड यांचा दावा फेटाळून लावत 2 महिन्याच्या आत जागा महामंडळाकडे परत करण्याचा निर्णय दि.15.06.2015 रोजी दिला. या आदेशाविरुद्धही श्री.गायकवाड यांनी मा. उच्च न्यायालयात अपील केले असता उच्च न्यायालयाने दि. 13.08.2015 रोजी श्री गायकवाड यांचे अपिल फेटाळून लावले आहे.

श्री.गायकवाड यांच्याबरोबर करण्यात आलेला करारनाम्याचा कालावधी समाप्त झाल्यानंतरही श्री. गायकवाड यांच्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन दि.01.05.2017 ते 30.04.2018 या कालावधीसाठी करार करण्यात आला होता. सदर कालावधी समाप्त झाल्यानंतरही श्री. गायकवाड हे जागा सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे महामंडळाने सक्षम प्राधिकारी, बृहन्मुंबई यांचे न्यायालयात केलेल्या अर्जात सक्षम प्राधिकारी यांनी दि. 14.01.2021 रोजी निष्कासनाचे आदेश पारित केले असून 1 महिन्याच्या आत जागा खाली करण्याचे व थकबाकीची रक्कम भरण्याचे निर्देश दिले आहेत 1 महिन्याचा कालावधी समाप्त झाला असून सक्षम प्राधिकरणामार्फत निष्कासनाची कार्यवाही  दि. 01.03.2021 रोजी करण्यात येणार आहे.

दरम्यान श्री. गायकवाड यांनी पुन्हा सक्षम प्राधिकरणाच्या आदेशाविरुद्ध याचिका दाखल केली असून सदर याचिकेवर आज दि.26.02.2021 रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान श्री. गायकवाड यांच्या वतीने उपस्थित असलेले वकील तसेच मुखत्यार पत्रधारक श्री. प्रफुल लक्ष्मण गायकवाड यांनी 4 आठवड्यांच्या आत जागा खाली करण्याचे मान्य केले आहे. मा. न्यायालयाने य बाबत प्रतिज्ञापत्र (Undertaking) देण्याचे निर्देश दिले आहेत. थोडक्यात मा. शहर दिवाणी न्यायालयाने सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले निष्कासनाबाबतचे आदेश कायम ठेवले आहे असे असतानाही श्री. गायकवाड यांनी चित्रनगरीतील त्यांच्या अनधिकृतपणे ताब्यात असलेल्या उपहारगृहामध्ये ठिय्या आंदोलन सुरु केले असून मला प्रतिकार केल्यास माझ्याजवळ गॅससिलेंडर असून त्याचा वापर करुन पेटवून घेण्याची धमकी सुरक्षा व्यवस्थेस दिली असून घोषणाबाजी करीत आहे.

मा. न्यायालयासमोर श्री. गायकवाड यांनी मान्य केलेली स्थिती व उपरोक्त कृती ह्या परस्पर विसंगत असून त्यांच्या कृतीतून प्रसार माध्यमे व राजकीय क्षेत्रातून दबाव निर्माण करण्याचा तसेच समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. महामंडळाच्या स्तरावरुन अत्यंत पारदर्शक पद्धतीने Food court / Canteen साठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. सदर निविदा प्रक्रियेत भाग न घेता एक साहित्यिक या प्रतिमेचा गैरवापर करुन काही काळासाठी दिलेली जागा कायमस्वरुपी मिळविण्याचा श्री. गायकवाड यांचा मानस असल्याचे स्पष्ट होत असून त्यासाठी त्यांनी दाखल केलेल्या न्यायालयीन प्रकरणी प्राप्त झालेल्या न्यायालयीन आदेशाचे पालन करण्यासही त्यांची तयारी नाही, ही बाब त्यांना एक साहित्यिक म्हणून निश्चितच शोभनीय ठरत नाही.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवार यांची प्रकृती पुन्हा खालावली:डिहायड्रेशनमुळे अशक्तपणा, पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल

पुणे:राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार...

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून:विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार; अजित पवारांच्या अपघाताबाबत संशय

सत्ताधारी पक्ष मस्तीमध्ये असल्याची टीका,घरगुती डिजिटल मीटरचा विरोध,सोलार...

आत्मचरित्र लिहिण्यास बंदी हि तर विचार स्वातंत्र्याची गळचेपी, स्वातंत्र्यावर गदा: अनंत गाडगीळ

मुंबई:माजी लष्कर प्रमुखांच्या पुस्तकातील एका संदर्भाचा संसदेत उल्लेख झाल्यांनतर...

रेड जायंट मूव्हीजच्या ‘KHxRK’मुळे 47 वर्षांनंतर कमल हासन आणि रजनीकांत एकत्र

रेड जायंट मूव्हीजच्या आगामी चित्रपट ‘KHxRK’ मुळे भारतीय चित्रपटसृष्टी...