पुणे : . भाजपा हा पुणे, पिंपरी-चिंचवडपासून ते दिल्लीपर्यंत भ्रष्टाचाराचा केंद्र आहे.ज्याला सत्तेचा माज व गुर्मी आहे. शहरातील ॲमिनिटी स्पेसच नव्हे, तर भाजपाने देशच विकायला काढला आहे. त्यांच्या चुकीच्या धोरणामुळेच पेट्रोल, डिझेल दरवाढ झाली, तरुण बेरोजगार झाले, शेतकरी हवालदील आहेत. ऑक्सीजनअभावी लोकांचा जीव गेला. असे असतानाही जनतेचे प्रश्न सोडविण्यापेक्षा कॉंग्रेस पक्षावर आरोप करण्याचाच भाजपाचा अजेंडा आहे.‘ऑनलाईन’ असणाऱ्या भाजपाला नागरीकच आता “ऑनलाईन ठेवतील.’’ ” अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात केली .
सद्भावना यात्रेनिमित्त पुणे दौऱ्यावर आलेल्या पटोले यांनी कॉंग्रेस भवनाला भेट दिली. यावेळी पक्षाच्या प्रभारी सोनल पटेल, निरीक्षक बसवराज पाटील,शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे , बाळासाहेब शिवरकर ,रत्नाकर गायकवाड ,अरविंद शिंदे ,अभय छाजेड,अविनाश बागवे आदी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही कार्यकर्त्यांनी पटोले यांच्या उपस्थितीत पक्षामध्ये प्रवेश केला. तसेच स्वातंत्र्यदिनी आफ्रिकेतील किलीमांजारो हे उंच शिखर सर करणाऱ्या धनकवडीतील स्मीता फुगे या तरुणीला कॉंग्रेस पक्षातर्फे एक लाख रुपये देऊन यावेळी तिचा सन्मान करण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी पटोले यांच्या उपस्थितीत पक्षामध्ये प्रवेश केला. तसेच स्वातंत्र्यदिनी आफ्रिकेतील किलीमांजारो हे उंच शिखर सर करणाऱ्या धनकवडीतील स्मीता फुगे या तरुणीला कॉंग्रेस पक्षातर्फे एक लाख रुपये देऊन यावेळी तिचा सन्मान करण्यात आला.
महागाई, इंधन दरवाढीचे खापर काँग्रेसवर फोडून भाजपाकडून जनतेची दिशाभूल.
राजीव गांधी यांनी घालून दिलेल्या मार्गाने वाटचाल करु.
पुणे, पिंपरी चिंचवड असो वा दिल्ली भारतीय जनता पक्षात गल्लीपासून दिल्लीपर्यंत भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. भाजपाने भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून आरोप मात्र ते दुसऱ्यांवर करत आहेत. त्यांच्याच आशिर्वादाने स्वीस बँकेतील भारतीयांचा काळा पैसाही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टचारी वृत्तीमुळेच देश रसातळाला गेला असून भाजपा हा भ्रष्टाचाराचे केंद्र असलेल्या पक्ष आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
नाना पटोले म्हणाले की, देश मागील ७ वर्षांपासून अधोगतीकडे जात आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेलने शंभरी पार केली आहे. या दरवाढीचे खापर काँग्रेसवर फोडून भाजपा आपली जबाबदारी झटकू पहात आहे. युपीए सरकारच्या काळातील ऑईल बाँडचे नाव पुढे करून मोदी सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. पेट्रोल डिझेलच्या करातून मोदी सरकारने भरपूर नफेखोरी केली आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यातही मोदी सरकारला अपयश आलेले आहे. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच कोरोनाने हजारो लोक मृत्यूमुखी पडले.
जनआशिर्वाद यात्रेचा समाचार घेताना पटोले म्हणाले की, देशात महागाई, बेरोजगारी वाढली आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत, त्याकडे लक्ष देण्यास भारतीय जनता पक्षाच्या सरकारला वेळ नाही. पेट्रोल डिझेलने सेंच्युरी पार केली असून आता दुसरी सेंच्युरी करण्यासाठी जनतेचा आशिर्वाद मागत असावेत. या यात्रेदरम्यान भाजपाच्या मंत्र्यांनी केलेली विधाने पाहता त्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्यात रस नसून मुळ मुद्द्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे. भाजपाच्या कारभाराला जनता कंटाळलेली असून आता जनताच त्यांना योग्य उत्तर देईल

