33 राज्यांमध्ये पेट्रोल आणि 18 राज्यांमध्ये डिझेलने 100 चा टप्पा केला पार
नवी दिल्ली – एकीकडे राजकीय स्तरावर एकमेकांवर बॉम्ब फेक करणाऱ्या राजकारणाचे दर्शन देशात होत असताना दुसरीकडे भारतीय जनतेवर महागाईचे बॉम्ब देखील फेकण्यात येत आहेत .देशातील पेट्रोलच्या दरात आज सलग सातव्या दिवशी वाढ झाली आहे. पेट्रोल डीझेल ,गैस च्या किंमती इतिहासात वाढल्या नाहीत एवढ्या वेगाने एवढ्या प्रचंड वाढल्याने वाहतूक आणि सर्वच स्तरावर महागाईच्या भस्मासुराच्या विळख्यात भारतातील नागरिक सापडला आहे .आज म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी तेल विपणन कंपन्यांनी पुन्हा पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 35 पैशांनी वाढ केली आहे. दिल्लीत पेट्रोल 110.04 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तर डिझेल 98.42 रुपयांवर स्थिर आहे. तर मुंबईत पेट्रोल 115.85 रुपये प्रति लिटरवर आले आहे.देशातील 33 राज्यांमध्ये पेट्रोलने 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दमण आणि दीव, छत्तीसगड, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, पुडुचेरी, तेलंगणा, पंजाब, सिक्कीम, ओडिशा, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, त्रिपुरा अरुणाचल प्रदेश, मिझोराम, झारखंड, गोवा, आसाम, गुजरात, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड, मेघालय, दादरा आणि नगर हवेली आणि राजस्थानमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर आहे.दुसरीकडे, डिझेलच्या बाबतीत, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, बिहार, गुजरात, नागालँड, महाराष्ट्र, दमण आणि दीव, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, केरळ, कर्नाटक, गोवा, दादरा आणि नगर हवेली, तामिळनाडू आणि राजस्थानात अनेक ठिकाणी ते 100 रुपयांच्या वरही आहे.
सात दिवसांत 2.45 रुपयांनी महागले
सात दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रचंड वाढ झाल्यानंतर त्याची किंमत 2.45 रुपयांनी महाग झाली आहे. त्याचवेळी डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2.10 रुपयांची वाढ झाली आहे.
ऑक्टोबरमध्ये 24 वेळा वाढल्या होत्या किंमती
ऑक्टोबरमध्ये पेट्रोल आणि डिझेल 24 वेळा महागले होते. जे कोणत्याही एका महिन्यात सर्वाधिक आहे. ऑक्टोबरमध्ये राजधानी दिल्लीत पेट्रोल 7.70 रुपयांनी तर डिझेल 8.20 रुपयांनी महागले होते.
क्रूडची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरपर्यंत पोहोचू शकते
जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर ते प्रति बॅरल 85 डॉलरच्या जवळ आहे. येत्या काही दिवसांत ते प्रति बॅरल 90 ते 100 डॉलर पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

