- कोरोना च्या काळातील रखडलेली कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यावर भर – नगरसेविका मंजुश्री खर्डेकर.
पुणे- प्रभाग क्र -१३ या भागातील नागरिकांना अपेक्षित असलेले काम खर्डेकर दाम्पत्य करत असून त्यांच्या भावी कार्यासाठी माझ्या शुभेच्छा आणि आशिर्वाद आहेत असे प पू योगश्री श्री राजेश जोशी महाराज म्हणाले. या भागातील नागरिकांनी सुचवलेल्या विकास कामांना प्राधान्य देऊन ती कामे दर्जेदार व्हावीत,नागरिकांची येवढीच अपेक्षा असल्याचे ही त्यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले. कोरोना चे रुग्ण वाढत असल्याने प्रभाग 13 मधील सर्व विकास कामांचे एकाच ठिकाणी भूमीपूजन करण्याचे ठरविले आणि त्यानुसार अभिनव शाळा ते वामन निवास या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे शुभारंभ जोशी महाराजांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रभागातील सर्व रखडलेली कामे येत्या 15 दिवसात पूर्ण केली जातील असे सौ खर्डेकर म्हणाल्या .गत वर्ष भरात कोरोना चा प्रादुर्भाव व लाँकडॉऊन मुळे अनेक कामे प्रलंबित होती त्या कामांना मंजुरी मिळाली असून आजपासून फुटपाथ,ड्रेनेज लाईन, पावसाळी लाईन, रस्ते यासह सर्वच कामे सुरु झाली आहेत.नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार सर्व कामे केली जातील व ती दर्जेदार होतील असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे,माधुरी सहस्त्रबुद्धे,कोथरूड भाजप अध्यक्ष पुनीत जोशी, प्रभाग अध्यक्ष राजेंद्र येडे, सरचिटणीस बाळासाहेब धनवे,नीलेश गरुडकर,ॲड.प्राची बगाटे ,जयश्री तलेसरा,रमा डांगे,माणिक दीक्षित, किरण देखणे व परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वच नागरिकांनी सौ. मंजुश्री खर्डेकर यांच्या कार्यपद्धती चे कौतुक करताना दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी त्या तत्पर असल्याचे सांगितले.
दीपक पोटे, जयंत भावे, माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले, संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन तर राजेंद्र येडे यांनी आभार प्रदर्शन केले.

