पुणे: लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सिटीझन हेल्पलाईन हा उपक्रम चालू केला आहे.महापालिका, सरकारी कार्यालये, विमा कंपन्या या संबंधित लोकांची कामे अथिक असतात. अनेकांना या खात्यांची कामकाजाची नेमकी माहिती नसते, दफ्तर दिरंगाई होते आणि त्यातून कामे खोळंबातात असा अनुभव येतो. अशावेळी लोकप्रतिनिधींकडे नागरीक अपेक्षेने धाव घेतात. हे लक्षात घेऊन वेगवेगळ्या खात्यांच्या जबाबदाऱ्या आमदार शिरोळे यांनी वाटून दिल्या आहेत. शिवाय जबाबदार व्यक्तींची नांवे आणि मोबाईल नंबर सोशल मिडीयाद्वारे नागरिकांना कळविले आहेत. सिटीझन हेल्पलाईन असे उपक्रमाला नांव दिले आहे.
माझा नेहमीच विश्वास आहे की, नागरी समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नागरिकांना त्यांच्या लोकप्रतिनिधींकडे थेट आणि सुलभ प्रवेश असणे आवश्यक आहे. हा विचार मनात ठेवून माझ्या जनसंपर्क कार्यालयामार्फत नागरिकांसाठी हेल्पलाईन चालू करीत आहे. नागरिकांनी समस्या सोडवून घेण्यासाठी माझ्या हेल्पलाईन टीमशी संपर्क करावा असे आवाहन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले आहे.