पुणे : शानदार समारंभ, बॉलिवूड ताऱ्यांसह शहरातील नामवंतांची उपस्थिती, नृत्य आणि संगीताची साथ, प्रेक्षकांकडून स्पर्धकांना मिळालेली भरभरुन दाद अशा जल्लोषाच्या वातावरणात ‘फेसपिक.इन प्रेझेंट्स सिटाडेल एक्स्ट्राव्हॅगन्झा २०१६ – मिस्टर अँड मिसेस सिटाडेल पुणे २०१६’ ही सौंदर्य स्पर्धा काल येथील हॉटेल ल मेरीडियनमध्ये संपन्न झाली.
उपांत्य फेरीतून निवडल्या गेलेल्या १४ स्पधर्कांमध्ये विजेतेपदासाठी चुरशीची स्पर्धा होती. अत्यंत बुद्धिमान मार्गदर्शक लोव्हेल प्रभू यांनी या सर्वांची उत्कृष्ट तयारी करुन घेतल्याने त्यातून ६ सर्वोत्तम स्पर्धक निवडण्याचे कठीण आव्हान सन्माननीय परीक्षकांपुढे होते. बराच विचार करुन परीक्षकांनी सहमतीने पुढील ६ स्पर्धकांची निवड केली.
विजेते – फरहान मकरानी (मिस्टर सिटाडेल पुणे २०१६) व त्रिशा मुखर्जी (मिस सिटाडेल पुणे २०१६)
द्वितीय क्रमांक (फर्स्ट रनर अप) – जिल्सन टी व भाविका तलवार
तृतीय क्रमांक (सेकंड रनर अप) – सार्थक कोहली व तनया यादव
बेस्ट स्माईल – जिल्सन टी व तनया यादव
मिस्टर अँड मिसेस फिजिक – कौस्तुभ फणसळकर व कोमल घोलप
मिस्टर अँड मिसेस फोटोजेनिक – प्रतीश कवठेकर व त्रिशा मुखर्जी
लोकप्रिय अभिनेता राजीव खंडेलवाल या समारंभाला प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. त्याच्या हस्ते सिटाडेल मासिकाच्या चालू महिन्याच्या अंकाचे प्रकाशन झाले आणि नंतर सौंदर्य स्पर्धेतील विजेत्यांना मुकूट घालून सन्मानित करण्यात आले.
परीक्षक मंडळात झायेद खान, कायनात अरोरा, शमा सिकंदर आदी नामवंतांचा समावेश होता.
सिटीडेलतर्फे याप्रसंगी नामवंत पुणेकरांचा त्यांचे योगदान व कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. त्यामध्ये ‘ए. के. एज्युकेशनल कन्सल्टन्सी’ व ‘ए. के. इंटरनॅशनल टुरिझम’ कंपन्यांचे संचालक डॉ. अमित कामले, एम.डी. (रशिया), पर्यावरणवादी कर्नल सुरेश पाटील व सतार वादक समीप कुलकर्णी यांचा समावेश होता.
‘मॅग्ना ग्रुप’चे अध्यक्ष नरी हिरा, व्यवस्थापकीय संचालक अशोक धामणकर, ‘सिटाडेल’च्या संपादक स्वप्ना अय्यर, निषाद शिंदे व नीरज कुमार यांनी यजमान या नात्याने कार्यक्रमाला उपस्थित सर्व पाहुणे व आमंत्रितांचे स्वागत केले.
पियुष मल्होत्रा आणि त्यांच्या कलाकारवृंदाने गणेश वंदना सादर करुन प्रेक्षकांना मुग्ध केले. त्या पाठोपाठ लावणी सम्राज्ञी मृण्मयी गोंधळकर यांचे लावणी नृत्य आणि स्टेपअप डान्स स्टुडिओ यांनी सादर केलेला बॉलिपॉप हा नृत्याविष्कार यामुळे प्रेक्षकांनाही तालावर थिरकायला भाग पाडले.
विनोदचतुर सचिन खुराणा आणि सौंदर्य़वान रिद्धीमा फाटक या दोघांनी मनोरंजनाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
या रंगारंग संध्येचा समारोप चविष्ट भोजनाने झाला. चोखंदळपणे निवडलेल्या उत्कृष्ट खाद्यपदार्थांचा रसिकांनी मनापासून आस्वाद घेतला.









