उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींसोबत गतवर्षी जूनमध्ये तासभर चर्चा
शिवसेनेचे 12 खासदार बंडखोर : कृपाल तुमाने, संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत गोडसे, राजेंद्र गवित, सदाशिव लोखडे, भावना गवळी, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, प्रतापराव जाधव, हेमंत पाटील
नवी दिल्ली- शिवसेनेच्या अठरा खासदारांबाबत व्हीप काढलेला नाही. तूर्तास आम्ही फक्त गटनेता बदलला असून पक्षाच्या प्रतोद आणि खासदार भावना गवळी शिवसेनेच्या सर्व खासदारांना व्हीप बजावतील. शिवसेना लोकसभा गट तयार करून 12 खासदारांचे पत्र सभापतींना दिले आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.शिवसेनेच्या बंडखोर खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली. उभयंतांची आज दुपारी एकत्रित बैठक झाली. यात कायदेविषयक बाबींवर चर्चा झाली. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र लिहिलंय. यामध्ये आमच्याकडे दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत असल्याचं सांगत शिंदे गटाने संसदेतील सेना कार्यालयावर दावा सांगितलेला आहे.शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन आमच्या सरकारला आहे. ते आम्हाला काहीही कमी पडू देणार नाही अशी त्यांनी ग्वाही दिली आहे. हे सरकार खऱ्या अर्थाने लोकांचे सरकार आहे.
शिवसेना लोकसभा गट तयार करून शिवसेनेच्या 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिले आहे. दिल्लीमध्ये येण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे ओबीसी आरक्षणाप्रकरणी उद्या सुनावणी आहे. यासाठी सर्व वकिलांशी बैठक, चर्चा होती. यासाठी दिल्लीत आलो आहोत. सर्व 12 खासदारांचं स्वागत करतो. त्यांनी घेतलेली बाळासाहेबांची घेतलेली भूमिका, आनंद दिघे यांचे विचार घेऊन आम्ही महाराष्ट्रात शिवसेना- भाजप युतीचं सरकार स्थापन केलं. जी भूमिका आम्ही 50 आमदारांनी घेतली त्याचं समर्थन राज्यभरातून शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केलं आहे. कारण जी सार्वत्रिक निवडणूक आम्ही लढलो ती एकत्र लढलो होतो.
आमचे निर्णय जलद
शिंदे म्हणाले, सरकार स्थापन होताच आम्ही अनेक निर्णय तातडीने घ्यायला सुरुवात केली. पेट्रोल, शेतकरी कर्जमाफी असो वा प्रलंबित कामांचे लोकहिताचे निर्णय आमचं सरकार घेत आहे. केंद्राचाही विशेषत: पंतप्रधान मोदींनी पूर्ण पाठिंबा सरकारला दिला आहे. राज्याला विकासाच्या बाबतीत कोणतीही कमी पडू दिली जाणार नाही.
फक्त गटनेता बदलला
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमदार, खासदारांनी प्रयत्न केले पण उद्धव ठाकरे यांनी ऐकले नाही त्यामुळे शेवटी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. अठरा खासदारांबाबत व्हीप काढलेला नाही. तो खासदार भावना गवळी काढणार आहे. तुर्तास आम्ही फक्त गटनेता बदलला.
मोदींसोबत ठाकरेंची तासभर चर्चा
राहूल शेवाळे म्हणाले की, उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक तास चर्चा झाली होती. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याशीही उद्धव ठाकरेंची चर्चा झाली होती पण वारंवार युतीची चर्चाच झाली तेव्हा मलाही युती करायची असे त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते असे सांगतानाच त्यांनी 2019 च्या वचननाम्याबाबत राहूल शेवाळे यांनी वाचन यावेळी केले.

