मुख्यमंत्री शिंदे यांनी 50 थर लावले नाहीत, तर 50 खोके मिळवले

Date:

मुंबई–‘50 थर लावून आम्ही कठिण हंडी फोडली’, या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंनी जोरदार पलटवार केला. आदित्य म्हणाले की, त्यांनी (शिंदे गट) 50 थर लावले नाहीत तर, 50 खोके मिळवले आहेत. यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत आदित्य म्हणाले की, भाजपला मुंबई म्हणजेच मलई दिसत आहे.आदित्य ठाकरे म्हणाले की, आमचे जे आमदार मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्यांचा विश्वासघात झाला आहे. कारण प्रत्यक्षात फक्त एकाच व्यक्तीने मलाई खाल्ली आहे. यासोबतच आज दहीहंडी उत्सवानिमित्त राजकीय वक्तव्य करण्याची इच्छा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दही हंडी उत्सवात हजेरी लावण्यात भाजपा नेते आणि मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री आघाडीवर

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही डझनभराहून अधिक दहीहंडी उत्सवात हजेरी लावली. त्यांच्या नेतृत्वाखाली आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार संपवण्याचा संकल्प करणारी दहिहंडी मुंबई भाजपातर्फे फोडण्यात आली. तरुणाईच्या जल्लोषात वरळीच्या ऐतिहासिक जांबोरी मैदानात आयोजित या दहीहंडी उत्सवात विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार राजहंस सिंह, उत्तर भारतीय महाराष्ट्र अध्यक्ष संजय पांडे, संजय उपाध्याय आयोजक संतोष पांडे आदी सहभागी झाले होते.कोरोना महामारीच्या संकटानंतर यंदा संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि ठाण्यात दहीहंडी उत्सव भव्यपणे साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 11 हून अधिक दहीहंडी उत्सवाच्या मंचावर हजेरी लावून शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना मागे टाकले. शिवसेनेच्यावतीने सुमारे 8 ते 9 दहीहंडी उत्सवात आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. तर 9 हून अधिक ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावून गोविंदा पथकांना प्रोत्साहन दिले.

प्रकाश सुर्वे- प्रवीण दरेकरांमध्ये सामना

मागाठाणे विधानसभा मतदारसंघात दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार प्रवीण दरेकर यांच्यात जोरदार शक्तीप्रदर्शन झाले. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोघांच्याही मंचावर हजेरी लावली. आमदार सुर्वे यांनी मराठी अभिनेत्रींचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून आणि गोविंदा पथकांना भरघोस रोख बक्षिसे देऊन दरेकरांना मागे टाकले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...