Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

लठ्ठपणाशी लढा’ या मोहिमेचे मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन …

Date:

पुणे : आपल्या जीवनशैलीत परिवर्तन झाले आहे. तसेच सुखासीनपणा आल्याने लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी चिंता व्यक्त केली. लठ्ठपणाचे मी स्वतः एक उदाहरण असल्याचे सांगत त्यांनी ‘हे चित्र बदलण्यासाठी लहानवयातच मुलांमध्ये संस्कार रुजविण्याबरोबच लठ्ठपणाविषयी प्रबोधन करणे आवश्यक आहे. त्यांच्या जीवनशैलीत बदल करायला हवा’, असा कानमंत्रही दिला.
रोटरी क्लब आॅफ कोरेगाव पार्क आणि जेटी फाऊंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘लहान मुलांमधील लठ्ठपणाशी लढा’ या मोहिमेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुरूवारी झाले, त्यावेळी ते बोलत होते. पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला खासदार अनिल शिरोळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, मोहिमेच्या निमंत्रक आणि तोडकर क्लिनिक व जेटी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. जयश्री तोडकर, रोटरीचे जिल्हा प्रांतपाल अभय गाडगीळ, क्लबचे अध्यक्ष संदेश गुप्ता, नवनीत गाला आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोहिमेचा लोगो व बीएमआय डायलरचे अनावरण करण्यात आले.
पुढील काळात देश घडविण्याची जबाबदारी असलेली पिढी नकळतपणे अक्षमतेकडे जात असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. लठ्ठपणाबरोबरच त्यानंतर येणारे रोगही वाढत आहेत. जीवनशैली व जेवणशैली बदलली असून आता सुखासीनपणा आला आहे. मागील ४० वर्षांमध्ये आपल्या पारंपरिक शैलीत खुप बदल झाला आहे. शरीरासाठी आवश्यक पोषण आहाराचा समतोल बिघडला असून लहान मुले त्याला बळी पडत आहेत. लहान मुलांमधील मैदानी खेळाचे प्रमाण कमी झाले आहे. संगणकावरही मैदानी खेळ आल्याने तेच खेळले जात आहेत, ही शोकांतिका आहे.
लठ्ठपणाचे मी एक उदाहरण आहे. त्यावेळी लठ्ठपणाविषयी अशा कोणत्याही मोहिमा नव्हत्या. आहारविषयी फारशी जागृती नव्हती. आता हे सगळे उपलब्ध होत आहे. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना त्यांच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट, हे सांगण्याची गरज आहे. शाळांनी मुलांमध्ये संस्कार रुजविण्याबरोबरच त्यांना लठ्ठपणाविषयी सांगणेही आवश्यक आहे. लठ्ठपणा हा सर्व रोगांची जननी आहे. त्यासाठी राज्यात कृती दलही स्थापन करण्यात आले आहे. आज पुण्यात सुरू झालेली मोहीम राज्यभर राबविण्यासाठी शासन सर्व सहकार्य करेल, असे मुख्यमंत्र्यांनी नमुद केले. मोहिमेची सुरूवात पुण्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांपासून केली जाणार असल्याची माहिती डॉ. तोडकर यांनी यावेळी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवसेनेने फुंकले महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग!

दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर उमेदवारी अर्ज वाटपाची सुरुवात पुणे – पुणे...

हिंदू देवतांच्या डीपफेक, अश्लील प्रतिमा आणि साईट्स पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा: प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी

जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण केली जात असल्याचा राज्यसभेत विशेष...

१९ वर्षाखालील मुलींच्या गटातील पुणे विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा संपन्न

पुणे:जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे; पुणे शहर बॉक्सिंग संघटना...

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

गौरीच्या आई-वडिलांसह घेतली मुख्यमंत्र्यांची भेट “महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यव्यापी उपाययोजना राबवा;...