मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांची सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बैठक
मुंबई
मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने चार दिवसीय छठपूजेची तयारी जोरात सुरू झाली असून या पूजेच्या तयारीबाबत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी
भाजपा मुंबई अध्यक्ष, आ. ॲड. आशिष शेलार आणि छठउत्सव महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. २८ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान मुंबईत छठपूजा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे.
छठपूजा उत्सव महासंघाचे अध्यक्ष मोहन मिश्रा आणि अमरजित मिश्रा यांनी छठपूजेच्या आयोजनात येणाऱ्या अडचणींबाबत मंत्र्यांना अवगत केले. समुद्र, नदी आणि जलाशयाजवळ जमणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्हेरीकेडिंग, फिरते स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था आणि पोलिस बंदोबस्त आदी व्यवस्था करण्याची विनंती छठपूजा उत्सव महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छठपूजेच्या आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी संबंधित जिल्हाधिकारी, महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांना छठपूजेच्या व्यवस्थापनात सहभागी होण्याचे आदेश दिले.
यावेळी आर.यू.सिंह जी,भाजपा बिहार प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्ष फूलसिंह,भाजपा बिहार प्रकोष्ठ मुंबई अध्यक्ष डॉ. मनोज झा, नगरसेवक शिवकुमार झा, महामंत्री सुशांत अम्बष्ठ, विशाल भगत, अशोक सिन्हा, सम्पति झा, रामशंकर यादव, जितेंद्र झा, अभय झा, देवेंद्र शर्मा, सरोज झा, सावित्री सिंह उपस्थित होते.

