पुणे-येथील कर्वे समाज सेवा संस्था व बापू ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड परिसरातील जयभवानी नगर वस्तीमध्ये महिला आरोग्याबाबत जनजागृती रँली व ठिकठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण करून जागतिक आरोग्य दिनानिमित्त महिला आरोग्याचा जागर करण्यात आला.
बापू ट्रस्ट च्या संचालिका भार्गवी दवर व कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर तसेच धर्मेंद्र पडळकर, प्रा. चेतन दिवाण, प्रा दादा दडस, केतकी केळकर व अल्मास मोमीन यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सकाळी १० वाजता कोथरूड येथील सुतार दवाखाना येथून बापू ट्रस्ट चे कर्मचारी व कर्वे समाज सेवा संस्थेच्या विद्यार्थ्यांनी महिला आरोग्य व मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणाऱ्या पोस्टर्स सह रँलीस सुरुवात करून दिवसभर जयभवानी नगर वस्ती परिसरामध्ये ठिकठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण केले. परिसरातील महिला व नागरिकांनी या कार्यक्रमास भरभरून दाद दिली व बापू ट्रस्ट आणि कर्वे समाजसेवा संस्थेच्या सह्भागींचे कौतुक केले.

