पुणे- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण जगतासाठी एक आदर्श असे उच्चविद्याविभूषित विद्यार्थी व व्यक्तिमत्व होते, त्यांनी खडतर शिक्षणप्रवासातून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवत त्यांच्यासारखेच विद्यार्जन करुन नावलौकिक मिळवावा अशी अपेक्षा कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर यांनी संस्थेमार्फत साजऱ्या करण्यात आलेल्या विध्यार्थी दिन कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली.
महाराष्ट्र सरकारद्वारे यावर्षीपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम केलेल्या शाळा प्रवेश दिनाचे औचित्य साधून डॉ बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे जाहीर करण्यात आले होते त्यानिमित्ताने आज संस्थेमध्ये समाजकार्याचे विद्यार्थी व प्राध्यापकांच्या उपस्थित हा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ महेश ठाकूर हे होते तर प्रा. शर्मिला सहदेव व प्रा. चेतन दिवाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
समाजकार्य प्रथम व द्वितीय वर्षाच्या प्रवीण गुंजाळ, दिपाली पवार, रोहित धायरकर, अजित मिसाळ व आकाश सावळकर यांनी मनोगते व्यक्त केली.
डॉ महेश ठाकूर, प्रा. शर्मिला सहदेव व प्रा. चेतन दिवाण यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मक़्बुल देशिंग यांनी केले तर आभार अभिजित काकडे यांनी मानले.